जॉन्सन अँड जॉन्सन आस्थापनाकडून अमेरिका आणि कॅनडा देशांमध्ये बेबी पावडरची विक्री बंद

पावडरमुळे कर्करोग होत असल्यामुळे अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सन आस्थापनाच्या विरोधात अनेकांनी खटले प्रविष्ट केले. ते ग्राह्य धरून तेथील न्यायालयाने तिला दंड ठोठावला होता. जागतिक स्तरावर या आस्थापनाला विरोध असतांना आता भारत सरकारनेही या आस्थापनावर भारतात बंदी घालणे आवश्यक !

जर्मन आस्थापन चीनमधून बाहेर पडून भारतात येणार

लावा इंटरनॅशनल या आस्थापनानंतर आता जर्मनीचे आस्थापन वॉन वेल्सनेही चीनमधील व्यवसाय बंद करून तो भारतात चालू करण्याचा निर्णय घेतला. हे आस्थापन बुटांचे उत्पादन करते.

भारत सैनिकांच्या हौतात्म्याचा सूड उगवू शकतो, या भीतीने पाकच्या लढाऊ विमानांची आकाशात गस्त

काश्मीरच्या हंदवाडा येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात भारताचे कर्नल, मेजर आणि अन्य सैनिक हुतात्मा झाल्याचा सूड भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करून घेऊ शकतो,

 पाकिस्तानमध्ये दोघा हिंदु मुलींचे अपहरण

एका मुलीचे धर्मांतर करून ४० वर्षीय मुसलमान व्यक्तीसह लग्न लावून दिल्याचे उघड

स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचा कोरोनामुळे मृत्यू

स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा (८६ वर्षे) यांचा २८ मार्चला कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांचा भाऊ राजकुमार सिक्टो एनरिक डी बॉरबॉन यांनी फेसबूकद्वारे याविषयीची माहिती दिली. कोरोनामुळे राजघराण्यातील व्यक्तीचे निधन होण्याची ही पहिलीच घटना आहे.

मी जी शांतता अनुभवत आहे, ती भयाण आहे ! – पोप फ्रान्सिस

इतिहासात प्रथमच पोप यांच्यावर एकट्याने प्रार्थना करण्याची वेळ

इटलीत कोरोनाचे थैमान, आतापर्यंत १० सहस्र २३ जणांचा मृत्यू

जगभरात आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ६ लाख ६३ सहस्र ७४० असून मृत्यू झालेल्यांची संख्या ३० सहस्र ८७९ इतकी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ४२ सहस्र १८३ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

वैद्यकीय सुविधांसाठी अमेरिकेकडून भारताला २१ कोटी ७७ लाख रुपयांचे साहाय्य

अमेरिकेने भारतासह अन्य ६४ देशांना १३ अब्ज रुपये साहाय्य करण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार अमेरिकेकडून भारताला २.९ मिलियन डॉलरर्स, म्हणजेच २१ कोटी ७७ लाख रुपयांचे साहाय्य मिळणार आहे.

चीनमध्ये कोरोनामुळे ५० टक्के डॉक्टरांना नैराश्य, तर ७१ टक्के दुःखी

चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणार्‍या ३९ रुग्णालयांतील १ सहस्र २५७ डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांची एक पहाणी करण्यात आली.