स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचा कोरोनामुळे मृत्यू

माद्रिद – स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा (८६ वर्षे) यांचा २८ मार्चला कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांचा भाऊ राजकुमार सिक्टो एनरिक डी बॉरबॉन यांनी फेसबूकद्वारे याविषयीची माहिती दिली. कोरोनामुळे राजघराण्यातील व्यक्तीचे निधन होण्याची ही पहिलीच घटना आहे. मारिया टेरेसा या स्पेनचे राजा फिलिप ४ थे यांच्या चुलत बहीण होत्या. मारिया यांची २६ मार्चला कोरोनाविषयीची चाचणी केल्यावर त्या ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर ३ दिवस त्या ‘व्हेंटिलेटर’वर होत्या.