वीजदेयकांची थकबाकी नको !

विविध सरकारी योजना तोट्यात चालल्यामुळे त्यांचे खासगीकरण होऊ लागले आहे. ग्राहकांनी महावितरणला साहाय्य न केल्यास त्याचेही खासगीकरण झाल्याविना रहाणार नाही, अशी स्थिती आहे. ग्राहक आणि महावितरण यांनी स्वयंशिस्त लावून न घेतल्यास त्याचा गंभीर परिणाम सर्वांनाच भोगावा लागणार आहे.

मराठी भाषेचे महत्त्व बिंबवा !

अमृतालाही जिंकणार्‍या मराठी भाषेचे श्रेष्ठत्व विसरून एका परकीय भाषेच्या आहारी जाणे अयोग्य आहे. सरकारने ‘मराठी भाषा गौरवदिन’ साजरा करण्याची औपचारिकता करण्यापेक्षा मराठी शाळांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे अधिक सयुक्तिक आहे.

राजकारण्यांचा भ्रष्टाचार प्रथम संपवा !

देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचे असेल, तर त्याचा प्रारंभ भ्रष्ट राजकारण्यांच्या कारवाईपासून केल्यास देशात अन्य कुणी भ्रष्टाचार करण्याचा विचार करणार नाही, हे निश्चित !

पालकांनी पाल्यांसाठी सर्वांगांनी सक्षम व्हावे !

मुलांना शैक्षणिकदृष्ट्या, तसेच मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पालकांनी आधी स्वत: सक्षम होणे आवश्यक आहे. पालकांनाच आता मुलांसाठी शिक्षक बनावे लागेल.

छत्रपती शिवरायांप्रमाणे कृती करा !

नुसती शिवजयंती साजरी करणे, ‘जय शिवाजी जय भवानी’ अशा घोषणा देणे आणि पुतळे बसवणे यांवरून राजकारण करून शिवरायांचे विचार कृतीत येतील का ? महाराजांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणले, तरच पुतळे उभारल्याचे सार्थक होईल. हा आदर्श शासनकर्त्यांनी समाजासमोर ठेवणे अपेक्षित आहे.

यंत्रांची प्रगती, मनुष्याची अधोगती !

यंत्र वापरण्याचे तंत्र जमले नाही, तर जीव परतंत्र म्हणजे यंत्रांच्या अधीन होण्याची शक्यता आहे, हे यातील लक्षात घ्यायचे सूत्र !

पवित्र नद्या प्रदूषणमुक्त करा !

भारतामध्ये नद्यांचे आध्यात्मिक माहात्म्य अनन्यसाधारण आहे. समाजामध्ये याविषयी श्रद्धा आहे आणि ते त्यादृष्टीने नद्यांकडे पहातात. प्रशासनाने भाविकांचा भाव आणि स्वच्छ पाणी ही प्राथमिक आवश्यकता समजून नद्या समयमर्यादा ठेवून स्वच्छ कराव्यात, हीच अपेक्षा !

गुन्हेगार (?) पोलीस !

पोलीस विभागाने गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी प्रयत्न होणे नगण्यच आहे.

‘दैवी’ आवाज !

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी या दिवशी निधन झाले. लताताईंचा ‘दैवी’ आवाज हीच त्यांची ओळख होती. याठिकाणी ‘दैवी’ हा शब्द महत्त्वाचा आहे. त्यांच्या आवाजाचे वर्णन करतांना अनेक जण ‘लतादीदींचा आवाज ‘दैवी’ आहे’, ..

सामाजिक माध्यमांचा अयोग्य वापर !

कोणतेही श्रम न करता मिळणार्‍या प्रसिद्धीच्या मागे लागून कधी ही युवती आणि तिचे मित्र गुन्हेगारीच्या उंबरठ्यापर्यंत पोचले, हे त्यांनाही कळलेच नाही.