भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा हवीच !

गुन्हेगारांना कायद्याचे भय न वाटण्यामागील कारणांचा अभ्यास करून त्यामध्येही सुधारणा करायला हवी, असे जनतेला वाटते. ही सर्व प्रक्रिया तत्त्वनिष्ठपणे आणि प्रामाणिकपणे केली, तरच देशातील भ्रष्टाचार अन् गुन्हेगारी संपेल, हे नक्की !

पालकांचे दायित्व आणि कर्तव्य !

सुसंस्कार, सुसंवाद, सुनियोजन या तिन्ही गोष्टी साध्य केल्यास मुले नक्कीच आदर्शत्वाकडे वाटचाल करतील. शेवटी एकच सांगावेसे वाटते, ‘आपल्याला वस्तू तोडणाऱ्या नव्हे, तर देशाचे भवितव्य घडवणाऱ्या हातांची आवश्यकता आहे आणि या हातांना बळ देणारे हात सक्षम अन् सजग पालकांचेच असायला हवेत !’

गडदुर्गांचे पावित्र्य जपा !

आपण आपल्या शिवरायांच्या गडदुर्गांविषयी किती प्रमाणात जागृत असायला हवे ? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. चांगले आदर्श नेहमी समोर ठेवून गडदुर्गच काय, तर आपला देशही स्वच्छ ठेवणे, हे आपले दायित्व आहे, हे ओळखून त्यासाठी प्रयत्नरत रहायला हवे.

संपामुळे हित कुणाचे ?

संपामुळे निर्माण झालेली स्थिती पाहिल्यास सर्व कुणासाठी चाललेले आहे ? कर्मचारी आणि सामान्य जनता यांना आतापर्यंत झालेल्या त्रासाचे दायित्व कुणाचे ?, एवढेच उद्गार सामान्य जनतेच्या मनात येतात. यातून हित कुणाचे ? हा प्रश्न निरुत्तरित रहातो !

अफूची शेती !

सरकारची अनुमती घेऊन इतर राज्यात शेतकरी अफूचे पीक घेत आहेत, मग महाराष्ट्रातच यावर बंदी का ? या पिकाच्या लागवडीतून चार पैसे मिळत असतील आणि सरकारच्या औषध उत्पादनात भर पडत असेल, तर या पिकाकडे ‘मादक पदार्थ’ म्हणून न पाहता ‘नगदी पीक’ म्हणून पहायचे का ? याचाही विचार करावा.

भूमी ‘तुकडेबंदी’चा पुनर्विचार व्हावा !

शासनाने शेतकर्‍यांच्या छोट्या-छोट्या शेतजमिनींचा विचार करून प्रकरणनिहाय विक्रीची अनुमती द्यावी. याविषयी महसूल विभाग आणि महसूलमंत्री यांनी गांभीर्याने विचार करावा.

हिंदूंनो, जागृत व्हा !

तेव्हा हिंदूंनो उठा, जागृत व्हा आणि छत्रपती शिवरायांना अपेक्षित अशी वीरश्री धारण करून त्यांना अपेक्षित असलेली राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य दिले; पण आता सुराज्य म्हणजेच रामराज्य आणण्यासाठी स्वतःला झोकून देऊया !

वीजदेयकांची थकबाकी नको !

विविध सरकारी योजना तोट्यात चालल्यामुळे त्यांचे खासगीकरण होऊ लागले आहे. ग्राहकांनी महावितरणला साहाय्य न केल्यास त्याचेही खासगीकरण झाल्याविना रहाणार नाही, अशी स्थिती आहे. ग्राहक आणि महावितरण यांनी स्वयंशिस्त लावून न घेतल्यास त्याचा गंभीर परिणाम सर्वांनाच भोगावा लागणार आहे.

मराठी भाषेचे महत्त्व बिंबवा !

अमृतालाही जिंकणार्‍या मराठी भाषेचे श्रेष्ठत्व विसरून एका परकीय भाषेच्या आहारी जाणे अयोग्य आहे. सरकारने ‘मराठी भाषा गौरवदिन’ साजरा करण्याची औपचारिकता करण्यापेक्षा मराठी शाळांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे अधिक सयुक्तिक आहे.

राजकारण्यांचा भ्रष्टाचार प्रथम संपवा !

देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचे असेल, तर त्याचा प्रारंभ भ्रष्ट राजकारण्यांच्या कारवाईपासून केल्यास देशात अन्य कुणी भ्रष्टाचार करण्याचा विचार करणार नाही, हे निश्चित !