छत्रपती शिवरायांप्रमाणे कृती करा !

नुसती शिवजयंती साजरी करणे, ‘जय शिवाजी जय भवानी’ अशा घोषणा देणे आणि पुतळे बसवणे यांवरून राजकारण करून शिवरायांचे विचार कृतीत येतील का ? महाराजांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणले, तरच पुतळे उभारल्याचे सार्थक होईल. हा आदर्श शासनकर्त्यांनी समाजासमोर ठेवणे अपेक्षित आहे.

यंत्रांची प्रगती, मनुष्याची अधोगती !

यंत्र वापरण्याचे तंत्र जमले नाही, तर जीव परतंत्र म्हणजे यंत्रांच्या अधीन होण्याची शक्यता आहे, हे यातील लक्षात घ्यायचे सूत्र !

पवित्र नद्या प्रदूषणमुक्त करा !

भारतामध्ये नद्यांचे आध्यात्मिक माहात्म्य अनन्यसाधारण आहे. समाजामध्ये याविषयी श्रद्धा आहे आणि ते त्यादृष्टीने नद्यांकडे पहातात. प्रशासनाने भाविकांचा भाव आणि स्वच्छ पाणी ही प्राथमिक आवश्यकता समजून नद्या समयमर्यादा ठेवून स्वच्छ कराव्यात, हीच अपेक्षा !

गुन्हेगार (?) पोलीस !

पोलीस विभागाने गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी प्रयत्न होणे नगण्यच आहे.

‘दैवी’ आवाज !

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी या दिवशी निधन झाले. लताताईंचा ‘दैवी’ आवाज हीच त्यांची ओळख होती. याठिकाणी ‘दैवी’ हा शब्द महत्त्वाचा आहे. त्यांच्या आवाजाचे वर्णन करतांना अनेक जण ‘लतादीदींचा आवाज ‘दैवी’ आहे’, ..

सामाजिक माध्यमांचा अयोग्य वापर !

कोणतेही श्रम न करता मिळणार्‍या प्रसिद्धीच्या मागे लागून कधी ही युवती आणि तिचे मित्र गुन्हेगारीच्या उंबरठ्यापर्यंत पोचले, हे त्यांनाही कळलेच नाही.

स्वार्थी कलाकार !

‘राजकारण्यांप्रमाणे अभिनेतेही आता रंग पालटत आहेत आणि राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अशा भूमिका करत आहेत’, असे जनतेने म्हटल्यास चूक ते काय ?’

मद्य उत्पादनावरच बंदी हवी !

किराणा दुकानांतून खुलेपणाने वाईन विक्री करण्याचा लहान मुले, विद्यार्थी आणि महिला यांच्यावर काय परिणाम होईल, याचा किंचित्ही विचार सरकारने केलेला नाही, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही.

सरकारचा जनताद्रोही निर्णय !

‘विकास, सुधारणा आणि प्रगती यांसाठी हा निर्णय घेण्यात आला असून यातून महसूल वाढतो’, असे सरकार सांगत आहे; पण या अत्यंत अयोग्य निर्णयाला मंत्रीमंडळातील कुणीही विरोध करू नये, हे देशातील लोकशाहीला अत्यंत लज्जास्पदच आहे.

व्यसनाधीन तरुणाई !

शैक्षणिक वारसा लाभलेल्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात एका मासात ८०० हून अधिक दारूच्या बाटल्या सापडल्या, अशी माहिती ‘पुणे प्लॉग्गर्स’ या संस्थेने दिली आहे. या घटनेतून तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.