इस्लामी नेते मौलाना अर्शद मदनी यांचे म्हणणे आहे, ‘नीतीश कुमार, चंद्राबाबू नायडू आणि चिराग पासवान हे धर्मनिरपेक्ष नेते नाहीत. ते मुसलमानांच्या विरोधात भाजपला साहाय्यक असतात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घाला.’
हिंदूंनो, विचार करा !

१. जे हिंदु नेते भाजपला साहाय्य करतात, त्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन मुसलमान नेते करतात. आज पुरोगामी, साम्यवादी आणि काँग्रेस पक्षाचे नेते जागोजागी हिंदु धर्माच्या विरोधात वक्तव्य करत असतात. हिंदु धर्माविषयी गरळ ओकतात. अशांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन कुणी केले, तर आश्चर्य ते काय ?
२. जे हिंदु नेते सनातन हिंदु धर्मावर टीका करून मुसलमानांसाठी इफ्तार मेजवान्यांचे आयोजन करतात, त्यांच्यासाठी आरक्षणाच्या घोषणा करतात, त्यांच्या कार्यक्रमांवर हिंदूंनी उद्या बहिष्कार घातल्यास आश्चर्य ते काय ?
३. ज्या वेळी मुसलमानांच्या हिताची गोष्ट येते, त्या वेळी हिंदू नेते त्यांना साहाय्य करतात; पण हिंदूंच्या हिताची गोष्ट असते, त्या वेळी हेच नेते हिंदूंना अपमानित करण्याचा प्रयत्न करतात. अशांवर कुणी बहिष्कार घालण्यास सांगितले, तर चुकीचे काय ?
हिंदूंनो, लक्षात ठेवा, प्रभावी संघटन करून स्वतःच्या संघटनशक्तीचा आविष्कार दाखवणे, हीच काळाची आवश्यकता आहे ! (२५.३.२०२५)
– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.