कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने केलेली भाजी घेण्यासाठीची व्यवस्था

अनेक ठिकाणी आता प्रशासन भाजी घेण्याची चांगल्या प्रकारची व्यवस्था करून देत आहे…..

रत्नागिरीत ३४ पैकी २१ कोरोना संशयित रुग्णांचे अहवाल आले ‘निगेटिव्ह’

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतांना रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला मात्र दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीत ३४ पैकी २१ संशयित रुग्णांची कोरोनाची चाचणी ‘निगेटिव्ह’ आली आहे.

अल्ट्राटेक सिमेंट, रत्नागिरीच्या वतीने पोलिसांना पाणी वाटप

कोरोना विषाणूमुळे जागतिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी दिवस-रात्र जनतेचे रक्षक पोलीस साहाय्य करत आहेत.

गोव्यात ३ कोरोनाबाधीत सापडले

गोव्यात विदेशातून आलेले ३ गोमंतकीय कोरोनाबाधीत असल्याचे त्यांच्या चाचणीअंती निष्पन्न झाले आहे. हे तिघेही रुग्ण पुरुष आहेत. त्यातील एक रुग्ण २३ वर्षांचा, दुसरा २९, तर तिसरा रुग्ण ५५ वर्षांचा आहे. काही दिवसांपूर्वी हे तिघे जण ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि स्पेन या देशांतून गोव्यात आले होते.

आंबा वाहतुकीला जिल्हाधिकार्‍यांकडून अनुमती

येथील जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आंबा वाहतुकीला अनुमती दिली आहे. आंबा वाहतुकीसाठी तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडून १ आठवड्याकरता ‘पास’ मिळणार आहे.

रत्नागिरीतील काही गावांत कुणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय : गावकर्‍यांनी स्वत:हून केले ‘क्वारंटाईन’

रस्त्यावर चिरे, दगड, मातीचा भराव किंवा बांबू बांधून रस्ते अन् वाटा केल्या बंद

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारपेठा चालू

२२ मार्चपासून बंद असलेली मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमधील पाचही बाजारपेठा कोकण आयुक्त शिवाजीराव दौंड यांच्या मध्यस्थीनंतर २६ मार्चपासून प्रायोगिक तत्त्वावर चालू करण्यात आल्या.

…अन्यथा दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश देईन ! – तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांची चेतावणी

जनता आपत्काळात दिलेल्या सूचना गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे अशी चेतावणी द्यावी लागते, हे जनतेला लज्जास्पद ! या संकटावर मात करण्यासाठी शासकीय आदेशांचे पालन करणे अपरिहार्य आहे.

पाकमध्ये जूनपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या २ कोटींपर्यंत पोचण्याची शक्यता ! – दैनिक ‘द डॉन’

पाकिस्तान येथील दैनिक ‘द डॉन’ने माहिती विश्‍लेषक ओसामा रिझवी आणि अहसान जाहिद यांनी माहिती विश्‍लेषक टॉमस प्यूओ यांच्या साहाय्याने एक अहवाल सिद्ध केला आहे. त्यानुसार पाकिस्तानने कोरोनाला आळा न घातल्यास जूनपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २ कोटींपर्यंत पोचेल !