अयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेले स्वागतफलक ठरत आहेत लक्षवेधी !

श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्री रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा यांनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक ठिकाणी लावलेले  स्वागतफलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

रामललाच्या आरतीला ‘ऑनलाईन’ उपस्थित रहाता येणार !

अयोध्येतील राममंदिरातील श्री रामललाच्या आरतीला उपस्थित रहाता यावे, यासाठी भाविकांच्या सेवेसाठी न्यासाच्या वतीने पाससाठी ‘ऑनलाईन’ अर्ज प्रक्रिया चालू केली आहे.

Ayodhya Rammandir Consecration : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र आहेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्य यजमान !

डॉ. अनिल मिश्र यांनी १६ जानेवारीच्या प्रायश्‍चित्त पूजनामध्ये सहभाग घेतला. आता पुढचे ७ दिवस ते यजमान असणार आहेत.

Yogi Adityanath Appeal Shankaracharyas : श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सर्व शंकराचार्यांनी सहभागी व्हावे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सर्व शंकराचार्यांनी सहभागी झाले पाहिजे. आम्ही त्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पाठवले आहे. जो क्षण जवळ येऊन ठेपला आहे, तो श्रेयवादाचा किंवा मान-अपमानाचा नाही.

वाराणसीतील ज्योतिषी गणेश्‍वर शास्त्री द्रविड आणि पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांची मुख्य आचार्यपदी नियुक्ती

अयोध्येत श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सिद्धता पूर्ण झाली आहे. याच क्रमाने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने कार्यक्रमाच्या मुख्य पुजार्‍यांची घोषणा केली आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून चालू झाली आहे.

वर्ष १९९० मध्ये १२५ कारसेवकांना आश्रय देणार्‍या श्रीमती ओम भारती यांना उद्घाटनाचे निमंत्रण !

श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी ८ सहस्र मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. यात श्रीमती ओम भारती यांचाही समावेश आहे. वर्ष १९९० मध्ये राज्यात मुलायम सिंह यांचे सरकार असतांना अयोध्येत आलेल्या कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला होता.

श्रीरामांवर टीका करणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाईसाठी ‘राम निंदाविरोधी कायदा’ व्हावा! – श्रीराम भक्तांची मागणी

‘मुसलमानांना फायदा आणि हिंदूंना कायदा’ असे धार्मिक पक्षपाती कायदे तत्कालीन काँग्रेस सरकारने केले होते. केंद्रातील मोदी सरकारने हे कायदे रद्द करावेत, अशी मागणी हिंदु राष्ट्र-जागृती जाहीर सभेत करण्यात आली.

मृत आईच्या भूमीवाटपाच्या वादामुळे तिघा कन्यांनी ९ घंटे अंत्यविधीच होऊ दिला नाही !

साधनेच्या अभावी स्वार्थलोलुपतेने गाठलेला उच्चांक दर्शवणारी ही लज्जास्पद घटना !

Ayodh Rammandir Consecration : श्रीराममंदिराचे बांधकाम अपूर्ण असूनही देवतेची प्रतिष्ठा शास्त्रसंमत ! – गणेश्‍वरशास्त्री द्रविड

‘श्रीराममंदिराच्या कळसाचे काम पूर्ण झाल्याखेरीज अपूर्ण असलेल्या मंदिरात श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होणे योग्य नाही’, असा आक्षेप अनेकांकडून घेतला जात आहे.

Dnyanwapi Shivling : वाराणसीच्या ज्ञानवापीतील शिवलिंग असणार्‍या हौदाच्या स्वच्छतेला सर्वोच्च न्यायालयाची अनुमती !

सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी येथे शिवलिंग सापडलेल्या हौदाची स्वच्छता करण्याची अनुमती दिली आहे. ही स्वच्छता जिल्हाधिकार्‍यांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. या वेळी शिवलिंगासारख्या वास्तूला हानी पोचवण्यात येऊ नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे.