Dnyanwapi Shivling : वाराणसीच्या ज्ञानवापीतील शिवलिंग असणार्‍या हौदाच्या स्वच्छतेला सर्वोच्च न्यायालयाची अनुमती !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी येथे शिवलिंग सापडलेल्या हौदाची स्वच्छता करण्याची अनुमती दिली आहे. ही स्वच्छता जिल्हाधिकार्‍यांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. या वेळी शिवलिंगासारख्या वास्तूला हानी पोचवण्यात येऊ नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

अद्याप हे शिवलिंग आहे, असे न्यायालयाकडून किंवा पुरातत्व विभागाकडून अधिकृतरित्या मान्य करण्यात आलेले नाही. या हौदाची स्वच्छता करण्याची मागणी हिंदु पक्षाकडून करण्यात आली होती. या हौदातील मासे मेल्याने त्याला दुर्गंध येत असल्याने ही मागणी करण्यात आली होती. या हौदाची मे २०२२ पासून स्वच्छता झोली नाही. हिंदु पक्षाच्या मागणीला मुसलमान पक्षाकडून विरोध करण्यात आला नाही.