उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सर्व शंकराचार्यांनी सहभागी झाले पाहिजे. आम्ही त्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पाठवले आहे. जो क्षण जवळ येऊन ठेपला आहे, तो श्रेयवादाचा किंवा मान-अपमानाचा नाही. मी असीन, देशाचा सामान्य नागरिक असेल अथवा शंकराचार्य असतील, कुणीही रामापेक्षा मोठे नाही. प्रभु रामचंद्रांपेक्षा मोठे कुणीही नाही. प्रत्येक माणसाला स्वतःचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शंकराचार्यांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे. त्यांनी ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये. त्यांनी निश्चित या सोहळ्याला उपस्थित राहिले पाहिजे, असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath's appeal
Requests all the Shankaracharyas to participate in the #RamMandirPranPratishtha !
Lakshmanpuri (Uttar Pradesh) : We have sent invitations to the Pranprathistha ceremony to all the Shankaracharyas.
As time is drawing… pic.twitter.com/bTfUsgwaAI
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 17, 2024
ज्योतिष, द्वारका, पुरी आणि श्रृंगेरी या चारही पीठांच्या शंकराचार्यांनी विविध कारणांमुळे श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित रहाणार नसल्याचे कळवले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे आवाहन केले आहे.