मृत आईच्या भूमीवाटपाच्या वादामुळे तिघा कन्यांनी ९ घंटे अंत्यविधीच होऊ दिला नाही !

मथुरा – येथे पुष्पा या ८५ वर्षीय महिलेच्या मृत्यूनंतर तिचा अंत्यविधी तब्बल ८ ते ९ घंटे रोखून धरण्यात आला. याचे कारण म्हणजे महिलेच्या ३ मुलींमध्ये तिच्या भूमीवाटपावरून झालेले भांडण होय. आईचा मृत्यू व्हायच्या आधी मोठी मुलगी श्रीमती मिथिलेश हिने आईला स्वत:च्या बाजूने वळवले आणि तिची भूमी विकून सर्व पैसे स्वत:कडे घेतले. आईचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच लहान मुली सुनीता आणि शशी यांनी स्मशानभूमी गाठली अन् त्या भूमीवाटपावरून मोठ्या बहिणीशी वाद घालू लागल्या. हे भांडण एवढ्या विकोपाला गेले की, यावर तोडगा काढल्याविना त्यांच्या आईचा अंत्यविधी होऊ दिला गेला नाही. शेवटी घटनास्थळी उपस्थित झालेल्या पोलिसांनी मध्यस्थी केली. तिघींमध्ये भूमीवाटपावरून लिखित करार झाल्यावर आईचा अंत्यविधी पार पडला.

सौजन्य : आज तक 

संपादकीय भूमिका 

साधनेच्या अभावी स्वार्थलोलुपतेने गाठलेला उच्चांक दर्शवणारी ही लज्जास्पद घटना !