पुणे – हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यामध्ये फलक प्रसिद्धी, सामूहिक नामजप आणि मारुति स्तोत्र पठण, प्रवचन तसेच ठिकठिकाणच्या मारुति मंदिरात ग्रंथ, सात्त्विक उत्पादनांचे कक्ष, फ्लेक्स प्रदर्शन लावणे, असे विविध उपक्रम राबवण्यात आले. ६ एप्रिल या दिवशी ठिकठिकाणच्या मारुति मंदिरात लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या कक्षाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे जिल्ह्यात एकूण २० हून अधिक ठिकाणी कक्ष लावण्यात आले, तसेच ३० पेक्षा अधिक ठिकाणी फलक प्रसिद्धी करण्यात आली.
वैशिष्ट्यपूर्ण
१. भैरवनाथ मंदिर पिंपळे गुरव येथे फलक लिखाण करतांना पुष्कळ जिज्ञासू थांबून फलक वाचत होते. ‘सनातनचे कार्य पुष्कळ छान आहे, आपल्या धर्मासाठी कुणीतरी सतत झटत आहे, हे बघून पुष्कळच छान वाटत आहे’, अशा प्रतिक्रिया त्या ठिकाणी आलेल्या भाविकांनी दिल्या.
२. एका प्रौढ वयाच्या काकूंनी, ‘तू जे कार्य करत आहेस, त्यात तुला उदंड यश मिळो’, असा आशीर्वाद फलक लिखाण करणार्या साधिकेला दिला.