मुंबईमध्‍ये खंडणीसाठी व्‍यावसायिकाचे अपहरण करणार्‍या ७ जणांना अटक !

व्‍यावसायिक भागीदारीतून निर्माण झालेल्‍या वादातून २४ एप्रिल या दिवशी हे अपहरण करण्‍यात आले होते. पोलिसांनी १३ घंट्यांमध्‍ये शेट्टी यांची सुटका केली.

शीतपेय विक्रेत्‍यांकडून ‘कुलिंग चार्जेस’च्‍या नावाखाली ग्राहकांची लूट !

छापील किंमतीहून अधिक किंमतीने वस्‍तू न विकण्‍याच्‍या शासनाच्‍या कायद्याचे शीतपेय विक्रेत्‍याकडून राजरोसपणे उल्लंघन केले जात आहे. येणार्‍या ग्राहकाची अडचण पाहून त्‍याच्‍याकडून मूळ किंमतीहून ३ ते ५ रुपये अधिक घेतले जात आहेत.

‘वंदे मातरम् शिवोत्‍सवा’ची सांगता २७ एप्रिलला भव्‍य ‘शिवगर्जना दुचाकी फेरी’ने होणार ! – नितीन शिंदे

राजवाडा चौक येथे ‘वंदे मातरम् शिवोत्‍सव’ चालू आहे. गेली २१ वर्षे शिवप्रतापभूमी मुक्‍ती आंदोलनाच्‍या माध्‍यमातून दिलेल्‍या लढ्याच्‍या छायाचित्र प्रदर्शनास नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.

शरीरसुखाची मागणी करत राजकीय नेत्‍याची महिलेला गाडीतच बेदम मारहाण !

आरोपी जयकिशन कांबळे हा राजकीय नेता असून तो एका राष्‍ट्रीय पक्षाशी संबंधित पदाधिकारी होता; मात्र काही दिवसांपूर्वी त्‍याच्‍यावर एका महिलेच्‍या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्‍यात बलात्‍काराचा गुन्‍हा नोंद करण्‍यात आला होता.

१ मेपासून विसावा मंडळाच्‍या ‘शिवोत्‍सव २०२३’ला प्रारंभ !

गेली ३६ वर्षे सातत्‍याने साजरा होणारा विसावा मंडळाचा शिवोत्‍सव १ मे या दिवशी प्रारंभ होत आहे.

संभाजीनगर येथून स्थानांतरित करण्यात आलेले पोलीस आयुक्त श्री. निखिल गुप्ता

दंगलीनंतर मासाभरात पोलीस आयुक्‍त निखिल गुप्‍ता यांचे स्‍थानांतर ! 

छत्रपती संभाजीनगर येथील दंगल प्रकरण आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निखिल गुप्‍ता यांच्‍यावर केलेल्‍या भ्रष्‍टाचाराच्‍या आरोपांची चौकशी होणे आवश्‍यक ! केवळ त्‍यांचे स्‍थानांतर करणे म्‍हणजे त्‍यांनी केलेल्‍या गुन्‍ह्यांना एकप्रकारे क्षमाच करणे, असे नव्‍हे का ?

राज्‍यातील सर्व शासकीय ध्‍वजारोहणाच्‍या ठिकाणी अल्‍पोपहाराची व्‍यवस्‍था !

महाराष्ट्र भूषण पुरस्‍कारा’च्‍या सोहळ्‍यात उष्‍माघातामुळे १४ नागरिकांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी जिल्‍हाधिकार्‍यांना सूचना दिली.

अभाविपच्‍या २० कार्यकर्त्‍यांविरुद्ध गुन्‍हा नोंद !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्‍या आवारातील अवैध ‘रॅपसाँग’ चित्रीकरण, तसेच विविध मागण्‍यांच्‍या संदर्भात अभाविपच्‍या कार्यकर्त्‍यांनी २४ एप्रिल या दिवशी विद्यापिठाच्‍या आवारात घोषणा देऊन आंदोलन केले होते.

पुणे महापालिकेचे स्‍थानिक संस्‍था करातून मिळणार्‍या महसूलाकडे दुर्लक्ष !

स्‍थानिक संस्‍था कराच्‍या (लोकल बॉडी टॅक्‍स) प्रलंबित प्रकरणांमधून मिळणार्‍या किमान २०० कोटींच्‍या उत्‍पन्‍नावर महापालिका प्रशासनाने पाणी सोडल्‍याचे वास्‍तव समोर आले आहे.

गोमांस वाहतूक आणि विक्री यांप्रकरणी २ धर्मांधांना अटक, १०० किलो गोमांस जप्‍त !

पोलिसांनी अनुमाने १०० किलो गोमांस, तसेच ज्‍या रिक्‍शातून गोमांसाची वाहतूक करण्‍यात आली ती रिक्‍शा जप्‍त केली आहे.