शामरावनगर (सांगली) परिसरातील दफनभूमीसाठी आरक्षित भूमीच्‍या भूसंपादन प्रक्रियेचे अन्‍वेषण करा !

सांगली येथील शामरावनगर परिसरातील मुसलमान आणि ख्रिस्‍ती दफनभूमीसाठी आरक्षित भूमीच्‍या भूसंपादक प्रक्रियेचे अन्‍वेषण करून त्‍याचा अहवाल सादर करावा, असे पत्र महाराष्‍ट्र शासनाचे अवर सचिव प्रणव कर्पे यांनी नगररचना संचालक आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्‍त यांना पाठवले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्‍णालय येथे २ नवजात शिशूंची अदलाबदल !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्‍णालयात नवजात शिशूंची अदलाबदल झाली. हा प्रकार २ मे या दिवशी उघडकीस आला. यामुळे संबंधित पालकांनी रुग्‍णालय प्रशासनाला धारेवर धरले.

हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने व्हावी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवतांना साकडे !

‘हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने व्हावी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे’, यासाठी कुडाळ तालुक्यातील बिबवणे गावातील श्री देव गिरोबाच्या चरणी श्री. भालचंद्र राऊळ (गावकर) यांनी गार्‍हाणे घातले.

ज्‍येष्‍ठ अभिनेते प्रशांत दामले यांना ‘ब्राह्मणभूषण’ पुरस्‍कार घोषित !

‘आम्‍ही सारे ब्राह्मण’ आणि ब्राह्मण व्‍यावसायिक पत्रिका या नियतकालिकांच्‍या वतीने देण्‍यात येणारा यंदाचा ‘ब्राह्मणभूषण’ पुरस्‍कार सुप्रसिद्ध ज्‍येष्‍ठ अभिनेते प्रशांत दामले यांना ६ मे या दिवशी पुणे येथे देण्‍यात येणार आहे, अशी माहिती नियतकालिकांचे मुख्‍य संपादक भालचंद्र कुलकर्णी आणि संचालक संजय ओर्पे यांनी दिली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बिहार आणि उत्तरप्रदेश येथील विविध मंदिरांमध्ये प्रार्थना

उत्तरप्रदेशातील सैदपूर, सुलतानपूर, कानपूर, वाराणसी आणि गोरखपूर, तर बिहारमधील पाटलीपुत्र (पाटणा), समस्तीपूर अन् हाजीपूर येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांना साकडे घालण्यात आले.

‘बसस्थानक स्वच्छ’ अभियानात व्हिडिओद्वारे प्रवाशांपर्यंत स्वच्छतेचे महत्त्व पोचवणार !

राज्यातील बसस्थानके स्वच्छ करण्यासाठी एस्.टी. महामंडळाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक’ हे अभियान महाराष्ट्रदिनाच्या दिवशी घोषित केले आहे.

मराठवाडा येथे मंत्रीमंडळ बैठकीच्‍या मागणीसाठी तरुणाचे टॉवरवर चढून आंदोलन !

मराठवाडा येथे मंत्रीमंडळाची १ दिवसीय बैठक बोलावण्‍याची मागणी करत एका तरुणाने महाराष्‍ट्रदिनी येथील जिल्‍हा परिषदेच्‍या टॉवरवर चढून आंदोलन केले, तसेच जोपर्यंत लेखी हमी दिली जाणार नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही, अशी भूमिका त्‍याने घेतली.

भारत हिंदु राष्ट्र झाल्यास जगावर सकारात्मक परिणाम होईल !

नेपाळ आधीपासूनच सैद्धांतिक रूपाने हिंदु राष्ट्र आहे. जर भारत हिंदु राष्ट्र झाले, तर त्याचा संपूर्ण जगावर सकारात्मक परिणाम होईल.

छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यात ७ ठिकाणी चालू होणार ‘वाळू डेपो’ !

वाळूच्‍या अवैध वाहतुकीसह तस्‍करीला आळा घालण्‍यासाठी सरकारने नव्‍या वाळू धोरणाची घोषणा केली आहे. त्‍यामुळे नागरिकांना बांधकामासाठी लागणारी वाळू आता थेट अधिकृत डेपोवरून विकत घेता येणार आहे. जिल्‍ह्यात ७ ठिकाणी ‘वाळू डेपो’ चालू केले जाणार आहेत.

सातारा येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा !

साहाय्‍यक धर्मादाय आयुक्‍त कार्यालय, सातारा आणि सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिती यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे