भारत हिंदु राष्ट्र झाल्यास जगावर सकारात्मक परिणाम होईल !

नेपाळचे माजी मुख्य न्यायाधीश गोपाल परांजली यांचे वक्तव्य !

मथुरा (उत्तरप्रदेश) – नेपाळ आधीपासूनच सैद्धांतिक रूपाने हिंदु राष्ट्र आहे. जर भारत हिंदु राष्ट्र झाले, तर त्याचा संपूर्ण जगावर सकारात्मक परिणाम होईल. यामुळे जगभरात रहात असलेल्या १७८ कोटींहून अधिक हिंदूंना गौरवाची अनुभूती येईल. याने त्यांचे आत्मबळही वाढेल, असे वक्तव्य नेपाळचे माजी मुख्य न्यायाधीश गोपाल परांजली यांनी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात केले.

या वेळी त्यांच्यासमवेत असलेले ‘पशुपतिनाथ विकास कोष, काठमांडू’चे प्रमुख सदस्य शास्त्री अर्जुन प्रसाद वास्तोलाही उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘आजपासून २ सहस्र ५३० वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्यांनी अधर्मियांकडून नष्ट करण्यात आलेल्या वेदिक सनातन संस्कृतीची स्थापना केली. आता पुन्हा एकदा शंकराचार्य यांच्या विचारांनीच सर्वांचे कल्याण होईल. जगभरात सर्वाधिक हिंदु लोकसंख्या असलेल्या भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यात यावे. भारत एक दिव्य देश असून येथे सदैवच ज्ञानाचा प्रवाह वहात राहिला आहे. यामुळे जगाचे कल्याण होईल.’’