जळगाव जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार !
जळगाव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नवजात शिशूंची अदलाबदल झाली. हा प्रकार २ मे या दिवशी उघडकीस आला. यामुळे संबंधित पालकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. रुग्णालय प्रशासनाने दोन्ही बाळांना कह्यात घेत नवजात शिशूंना अतीदक्षता विभागात भरती केले. पोलिसांच्या वतीने डी.एन्.ए चाचणीद्वारे हे शिशू आता खर्या मातांच्या स्वाधीन केले जाणार आहेत. हा प्रकार आधुनिक वैद्य आणि प्रशिक्षणार्थी परिचारिका यांच्या चुकीमुळे झाला. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी चौकशी समिती गठीत केली आहे.
दोन गर्भवती महिलांमध्ये एकीला मुलगा आणि दुसरीला मुलगी झाली. नवजात शिशू पालकांकडे सोपवतांना प्रशिक्षणार्थी परिचारिका विद्यार्थिनीकडून संबंधित पालकांना निरोप देण्यात गोंधळ झाला. यामुळे त्यांची अदलाबदल झाली. चूक उघड होताच प्रसूती कक्षात एकच गोंधळ झाला. पालक आक्रमक झाले.