मद्याची अवैध वाहतूक : २ जणांवर गुन्हा नोंद

मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली येथील पोलीस तपासणी नाक्यावर पोलिसांनी गोवा बनावटीच्या मद्याच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात ५ एप्रिलला रात्री कारवाई केली.

चौकुळ येथे गवारेड्याच्या आक्रमणात एक जण घायाळ

तालुक्यातील चौकुळ गावातील सीताराम विश्राम गावडे (वय ८० वर्षे) यांच्यावर ५ एप्रिलला एका गवारेड्याने त्यांच्या घरानजीक आक्रमण करून त्यांना घायाळ केले.

डिचोली येथे ‘धर्मवीर ज्वाले’चे आगमन !

धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलीदानमासाच्या निमित्ताने सतत ४० दिवस संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करणार्‍या ‘धर्मवीर ज्वाले’चे ७ एप्रिल या दिवशी डिचोली येथे आगमन झाले. ‘धर्मवीर ज्वाले’चे डिचोली ते सांखळी मार्गावरील नारायण झांट्ये महाविद्यालयाजवळ भव्य स्वागत करण्यात आले.

५ महिन्यांत मुंबईतील केवळ ४ सहस्र ३५८ वाहने प्रदूषण करत असल्याचे निष्पन्न !

मुंबईसारख्या अवाढव्य शहरात प्रतिदिन सहस्रो वाहने प्रदूषणकारी धूर सोडत असतांना केवळ १४ टक्के वाहनेच प्रदूषणकारी कशी आढळली ?

मुंबईत महिलांसाठी रात्रीचा रेल्वेप्रवास असुरक्षित ! – रेल्वे पोलिसांच्या अहवालाचा निष्कर्ष

शासनासह पोलिसांनाही ही आत्मपरीक्षण करायला लावणारी गोष्ट आहे. ही स्थिती का ओढवली आहे ? याचा गांभीर्याने विचार केला, तर यावर परिणामकारक उपाययोजना निघू शकतात !

कोपरखैरणे (नवी मुंबई) येथे लाखो लिटर पाण्याच्या गळतीमुळे चाळीत पूरपरिस्थिती !

अशा कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! महाराष्ट्रात आधीच पाणीटंचाई आहे. अशा मानवी चुकांमुळे पाण्याची नासाडी झाली त्याचे काय ? ती कोण भरून काढणार ?

महाराष्ट्रातील १५० पैकी ४० ट्रॉमा केअर सेंटर बंद असल्याचे ‘सुराज्य अभियाना’च्या माहिती अधिकारातून उघड !

रस्ते अपघातांच्या वेळी रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, जेणेकरून अपघातग्रस्तांच्या मृत्यूंचे प्रमाण अल्प व्हावे, यासाठी राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर १५० ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत मात्र यांतील ४० ट्रॅामा केअर सेंटर बंद आहेत.

चुकीचे विचार रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना सक्षम आहे  ! – खासदार विनायक राऊत

लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विरोधकांकडून विकृत वाणी बाहेर पडेल, यापुढे जिल्ह्यात दादागिरी चालणार नाही. यापूर्वी गडचिरोली, नंतर सिंधुदुर्ग जिल्हा संवेदनशील जिल्हा झाला होता.

खल्वायनच्या गुढीपाडवा मैफलीत रंगणार सुप्रसिद्ध गायिका रागेश्री वैरागकर यांचे गायन

१९९८ पासून गुढीपाडवा आणि दिवाळी पाडवा अशा सणांना आयोजित केली जाणारी ही विशेष संगीत मैफल यावर्षीच्या गुढीपाडव्याला होणारी सुवर्ण महोत्सवी विशेष संगीत मैफल आहे.

४०० पेक्षा अधिक खासदार निवडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्यायची वर्धापनदिनाची भेट ! – मंत्री रवींद्र चव्हाण

आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘अब की बार ४०० पार’ खासदार निवडून द्यायचे आहेत, ही वर्धापनदिनाची खरी भेट ठरेल- रवींद्र चव्हाण