मालेगाव आणि संभाजीनगर येथे चोरी करणार्‍या बुरखाधारी महिलांच्या ३ टोळ्या जेरबंद

उच्चभ्रू दुकानांमधून महागड्या साड्या, कपडे, सोन्याचे दागिने चोरणार्‍या बुरखाधारी महिलांच्या ३ टोळ्या लष्कर आणि मुंढवा पोलिसांनी जेरबंद केल्या आहेत.

डिंगणे येथील कोतवालाच्या आत्महत्येच्या प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

तालुक्यातील गावठणवाडी, डिंगणे येथील कोतवाल संतोष राजाराम नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी डिंगणे येथील नितीन श्रीधर सावंत आणि चंद्रकांत गणपत सावंत या दोघांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी बजावली.

कोल्हापूर डीस्ट्रिक्ट माऊंटेनिअरिंग असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्वतदिन साजरा !

कोल्हापूर डीस्ट्रिक्ट माऊंटेनिअरिंग असोसिएशन आणि त्यांच्याशी  संलग्न ७४ संस्थांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्वतदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक डोंगर शिखरांवर आरोहण आणि पर्वत पूजन आयोजित करण्यात आले होते.

मागील आश्‍वासनांची पूर्तता न झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची केंद्र सरकारला आंदोलनाची चेतावणी

दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला आंदोलनाची चेतावणी दिली आहे.

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कृषी सुधारणा विधेयक पुस्तिकेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

कृषी सुधारणा विधेयक २०२० या कायद्यात शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी आणि आर्थिकदृष्ट्या उन्नतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत

अमरावती येथे आधुनिक वैद्यांच्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन

‘डॉक्टर म्हणजे रुग्णांचे देवच असतात. कोरोनाचा उदय कसा झाला, हे प्रगत विज्ञानालाही शोधता आलेले नाही; म्हणून आपण प्रत्येकानेच साधना करणे आवश्यक आहे’,

‘भामा-आसखेड’च्या पाण्यावरून जलसंपदा आणि महापालिका यांच्यात वाद होण्याची शक्यता

भामा-आसखेड योजना कार्यान्वित झाल्यानंतर खडकवासला धरणातून महापालिकेला दिल्या जाणार्‍या पाणी कोट्यात २.६४ टीएम्सीने कपात केली जाईल

केंद्रशासनाचा ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट २०१०’ महाराष्ट्रात तातडीने लागू करावा !

वैद्यकीय क्षेत्रातील अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी केंद्रशासनाचा ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट २०१०’ तातडीने लागू करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देण्यात आले.

सावंतवाडीत प्राणघातक आक्रमण झालेल्या टेम्पोचालकाचे निधन

जिमखाना मैदानानजिक लुटण्याच्या उद्देशाने टेम्पोचालक अजयकुमार श्रीपतराव पाटील (हाडोळी, कोल्हापूर) त्यांच्यावर दोघांनी चाकूने प्राणघातक आक्रमण केले होते. यामध्ये ते गंभीर घायाळ झाल्याने रुग्णालयात उपचार चालू असतांना निधन झाले.

कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

कांजूरमार्ग ‘मेट्रो-३’ च्या कारशेडचे काम त्वरित थांबवा, परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.