नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात जमावबंदी

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसेच नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही २५ डिसेंबर २०२० ते ५ जानेवारी २०२१ या कालावधीत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी राज्याच्या गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी १ जानेवारी या दिवशी होणार्‍या अभिवादन कार्यक्रमासाठी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

पिंपरी येथील ‘वाय.सी.एम्.’ रुग्णालयामध्ये सुरक्षा रक्षकाकडून रुग्ण तरुणीचा विनयभंग

महानगरपालिकेच्या ‘वाय.सी.एम्.’ रुग्णालयामध्ये ‘मी पोलीस आहे’ असे म्हणत सुरक्षा रक्षकाने रुग्ण तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अश्लील ध्वनीचित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी पाटण (जिल्हा सातारा) येथील राष्ट्रवादी काँग्रसच्या नगरसेवकांना अटक : एक दिवसाची पोलीस कोठडी

प्रेस नावाच्या ‘व्हॉट्सॲप’ गटावर २५ डिसेंबर या दिवशी अश्लील ध्वनीचित्रफीत प्रसारित केल्यामुळे पाटण (जिल्हा सातारा) येथील नगरपंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन कुंभार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता.

जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरातील पथदीप दिवसाही चालूच !

पोलीस मुख्यालयाच्या पूर्वेच्या दगडी भिंतीला एक पथदीप बसवण्यात आला आहे. हा पथदीप दिवसा-उजेडी चालू असून त्याकडे पोलीस दलातील सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.

‘ॲमेझॉन’च्या कामात अडथळा न आणण्याचे न्यायालयाचे मनसेला निर्देश

‘ॲमेझॉन’ आस्थापन आणि त्यांचे कर्मचारी यांना त्यांचे काम करण्यापासून कोणत्याही प्रकारची अडवणूक करू नये,=दिंडोशी दिवाणी न्यायालय

शरद पवार यांच्याविषयी ‘जाणता’ नव्हे, तर ‘विश्वासघात राजा’ म्हणून लिहिले जाईल ! – माजी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची सडकून टीका

नव्या कृषी कायद्याला पाठिंबा देण्याकरिता रयत क्रांती संघटना आणि भाजप यांच्याकडून ‘किसान आत्मनिर्भर यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. त्या वेळी ते बोलत होते.

उपसभापतिपदाच्या निवडणुकीत मतदान करणे सांविधानिक अधिकार नाही – राज्य सरकार

शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांची उपसभापतिपदी झालेली नियुक्ती कायदेशीर कि बेकायदेशीर याचा निर्णय ७ जानेवारीला देणार असल्याचे खंडपिठाने स्पष्ट केले.

भिवंडीतील काँग्रेसच्या १६ नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

सर्व नगरसेवकांनी भाजपला मदत केली म्हणून काँग्रेस पक्षाने त्यांना नोटीस दिली

१ जानेवारीला पुणे-नगर महामार्ग बंद रहाणार !

१ जानेवारी या दिवशी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे-नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे