कल्याण-डोंबिवली येथे विनाअनुमती उभारलेल्या फटाक्यांच्या दुकानांवरील कारवाई थंड !

उच्च न्यायालयाने दिलेले आदेश, कायदे आणि नियम यांचे उल्लंघन होत असतांनाही प्रशासन आणि पोलीस यांच्याकडूनही बघ्याची भूमिका घेतली जात असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

हलाल सक्तीच्या विरोधात पेण येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन !

आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. या प्रसंगी विविध आस्थापने आणि शासन यांना देण्यात येणार्‍या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या.  

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दरोडेखोराला पकडले !

येथील पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगावातील एका बंगल्यातून दरोडेखोराला पकडले आहे. त्याच्या हातात पिस्तुल होते. तो एका बंगल्यात शिरला होता. पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात तो होता.

दिवाळीनिमित्त आस्थापनांच्या विज्ञापनांमध्ये बहुतांश मॉडेल्सना कुंकू-टिकली विना दाखवले !

हिंदूंच्या सण-उत्सवांमध्ये पैसा कमवणार्‍या; परंतु हिंदूंच्या धार्मिक परंपरेला डावलणार्‍या आस्थापनांच्या वस्तू खरेदी करायच्या का ? याचा विचार आता हिंदूंनीच करणे आवश्यक आहे !

फटाक्यांमुळे महाराष्ट्रात ३० हून अधिक आगीच्या घटना, अनेक जण घायाळ !

प्रदूषण, आर्थिक हानी आणि दुर्घटना यांना कारणीभूत ठरणारे फटाके टाळल्यास दिवाळी अधिक आनंदाची होईल !

परिवहन विभागाच्या कारवाईत १ सहस्र १३७ खासगी ट्रॅव्हल्समधील अग्नीशमनयंत्रणा बंद असल्याचे आढळले !

नाशिक येथे खासगी ट्रॅव्हल्सला आग लागून ११ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर १ सहस्र १३७ खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांतील अग्नीशमनयंत्रणा बंद असल्याचे आढळून आले.

अभिनेत्री उर्फी जावेद यांनी अर्धनग्न होऊन दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा !

दिवाळी हा मांगल्याचा आणि पावित्र्याचा सण आहे. अशा प्रकारे अश्‍लाघ्य कृती करून दिवाळीच्या शुभेच्छा देणार्‍या अभिनेत्रींचा हिंदूंनी निषेध केला पाहिजे !

सातारा परिवहन कार्यालयाकडून मनमानी भाडे आकारणार्‍या १३१ बसगाड्यांवर कारवाई

१ लाख २६ सहस्र रुपयांची दंड आकारणी

पुणे येथील अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्य्रावर गुन्हा नोंद करण्यास पोलिसांची टाळाटाळ !

गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणार्‍या पोलिसांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे ! अशा पोलिसांमुळेच जनतेचा पोलिसांवरील विश्‍वास उडाला आहे !

खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांच्या ‘ऑनलाईन’ तिकीटदरांवर नियंत्रण ठेवण्यास परिवहन विभाग अपयशी !

‘बुकींग सेंटर’वर शासनमान्य दर असलेल्या गाड्यांच्या तिकिटांची ‘ऑनलाईन’ विक्री दुपटीहून अधिक दराने !