नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दरोडेखोराला पकडले !

नाशिक – येथील पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगावातील एका बंगल्यातून दरोडेखोराला पकडले आहे. त्याच्या हातात पिस्तुल होते. तो एका बंगल्यात शिरला होता. पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात तो होता. त्याला स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने पकडून त्यांनी पोलिसांच्या कह्यात दिले. २४ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ही घटना घडली.