हलाल सक्तीच्या विरोधात पेण येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन !

आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

पेण – भारत सरकारच्या अधिकृत ‘एफ्.एफ्.एस्.एस्.आय.’ आणि ‘एफ.डी.ए.’ या संस्था उत्पादनांचे प्रमाणीकरण करत असतांनाही काही खासगी मुसलमान संस्थांकडून हिंदु व्यापारी आणि उद्योजक यांच्यावर हलाल प्रमाणपत्राची सक्ती केली जात आहे. या विरोधात पेण नगरपरिषदेसमोर हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २३ ऑक्टोबर या दिवशी आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. या प्रसंगी विविध आस्थापने आणि शासन यांना देण्यात येणार्‍या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या.

आंदोलनात मनसेचे श्री. सुनील मोदी, गोरक्षक सामाजिक संस्थेचे श्री. मंगल पाटील, दिघाटी गावचे उपसरपंच श्री. रोहिदास शेडगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पावसकर, हलाल कृती समितीचे श्री. सुधाकर पोटे, श्री. अभय पाटील आणि सनातन संस्थेचे श्री. जगन्नाथ जांभळे आदी मान्यवरांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.