अभिनेत्री उर्फी जावेद यांनी अर्धनग्न होऊन दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा !

अभिनेत्री उर्फी जावेद

मुंबई – अभिनेत्री उर्फी जावेद यांनी अत्यंत अश्‍लाघ्य पद्धतीने हिंदूंना त्यांचा सर्वांत महत्त्वाचा सणाच्या, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरिराच्या वरील भागात कोणतेही वस्त्र परिधान केलेले नाही आणि एका हाताने त्यांनी तिचे स्तन झाकले आहेत. त्यांच्या समोर पणत्या ठेवल्या आहेत आणि त्या कामुक हावभाव करत लाडवाच्या आकाराची मिठाई खात आहेत, तसेच पार्श्‍वभूमीवर कामुक गीत लावले आहे. ‘‘भारतीय संस्कृतीत महिलांच्या शरिराकडे कधीही फक्त वासनेच्या भावनेने बघितले गेले नव्हते. मोगल आक्रमणानंतर महिलांना त्यांचे शरीर झाकणे भाग पडले’’, असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या संदर्भात केलेल्या त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये कालीमातेचे चित्र प्रसारित केले आहे आणि पुढे म्हटले आहे, ‘‘आपण महिलांची, त्यांच्या शरिराची पूजा करायचो. महिलांचा आदर केला जात असे. मी भारतीय संस्कृती नष्ट करत आहे, असे म्हणणार्‍यांनी आधी नीट अभ्यास करावा. ज्यांना भारतीय संस्कृतीविषयी शिकायचे आहे, त्यांना शिकवण्यात मला आनंदच आहे; कारण तुमच्यासारख्या अर्धवट ज्ञान असलेल्यांच्या तुलनेत मी नक्कीच अधिक अभ्यास केला आहे.’’ (‘लज्जारक्षण’ हा भारतीय स्त्रीचा मूलभूत आणि अविभाज्य संस्कार आहे. भारतीय संस्कृती शिकवण्याचा आव आणणार्‍या उर्फी जावेद यांनी हे लक्षात घ्यावे की, पैसे मिळवण्यासाठी अंगप्रदर्शन करणे, ही स्त्रियांची संस्कृती नाही ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • दिवाळी हा मांगल्याचा आणि पावित्र्याचा सण आहे. अशा प्रकारे अश्‍लाघ्य कृती करून दिवाळीच्या शुभेच्छा देणार्‍या अभिनेत्रींचा हिंदूंनी निषेध केला पाहिजे ! हिंदु सहिष्णू असल्यामुळेच कुणीही त्यांच्या सणांचा वापर हवा तसा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करून घेत आहे !
  • दिवाळीला लक्ष्मीपूजन केले जाते आणि उर्फी जावेद यांनी या शुभेच्छांच्या नावाखाली अप्रत्यक्षपणे कालीमातेशी स्वतःची तुलना करून हिंदु देवतांचा आणि हिंदूंचा अवमान केला आहे !