गोवा आणि उत्तराखंड राज्यांत पर्यटनवृद्धीसाठी सामंजस्य करार !

मठ-मंदिरांमुळे गोव्याची ओळख ही ‘दक्षिण काशी’ अशी आहे. आता उत्तर काशी ते दक्षिण काशी गोवा अंतर अडीच घंट्यांत कापले जाईल. दोन्ही राज्य सरकारांच्या करारानुसार पर्यटनवृद्धीला चालना मिळणार आहे.

गोव्यात होणार्‍या ‘सी-२०’ परिषदेच्या माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रकाशन !

या प्रकाशनानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेले विविध आध्यात्मिक संशोधन आणि देश-विदेशांतील कार्य यांविषयी जाणून घेत या कार्याचे कौतुक केले.

गोव्यात २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून देण्याच्या अधिसूचनेला अधिकोषांकडून हरताळ

‘रिझर्व्ह बँके’ने जरी अधिसूचना काढलेली असली, तरी ती अधिसूचना केवळ ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’लाच यांनाच लागू आहे आणि इतर अधिकोषांना ती लागू नाही’, अशी उडवाउडवीची उत्तरे अधिकोषांतील काही अधिकारी देत आहेत.

मांद्रे, पेडणे येथे ‘धनुष्य आणि बाण’ यांची भव्य प्रतिकृती उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे, गोवा

गोव्यात काणकोण येथे श्री परशुराम मंदिर सोडल्यास अन्य कुठेही भगवान परशुराम यांच्याशी निगडित वास्तू नाही. यामुळे आम्ही भगवान परशुराम यांचे प्रतीक असलेले ‘धनुष्य आणि बाण’ यांची प्रतिकृती उभारणार आहोत.

जैवविविधता नोंदणी पुस्तिकेचे अद्ययावतीकरण आणि पडताळणी या राष्ट्रीय मोहिमेचा गोव्यात प्रारंभ

‘‘निसर्गातील नाजूक समतोल राखणे  महत्त्वाचे आहे. एखाद्याने निसर्गाकडून जितके घेतले आहे, तेवढे परत केले पाहिजे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जैवविविधतेचे संवर्धन ही गुरुकिल्ली आहे.’’

गोवा : पालिका संचालनालयाच्या आदेशानुसार म्हापसा पालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम २ दिवस स्थगित

पालिका २ दिवस मोहीम स्थगित करणार असून त्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोहीम नव्या जोमाने आरंभ करणार, असे म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षांनी सांगितले.

गोवा : सांकवाळ येथील खाडीत मासेमारी करणार्‍या युवकाला सापडली देवीची मूर्ती

पुरातन विजयादुर्गा मंदिराच्या जागेच्या परिसरात असलेल्या खाडीमध्ये आयुष नाईक हा युवक मासेमारी करण्यासाठी गेला असता त्याला सूर्यप्रकाशामध्ये खाडीतील पाण्यामध्ये चमकणारी देवीची मूर्ती दिसली.

सोनसोडो येथे प्रतिदिन १५ मेट्रीक टन कचर्‍याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प उभारणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा

प्रतिदिन एकूण ३५ टन ओल्या कचर्‍यापैकी प्रशासन प्रतिदिन १५ टन कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारणार, तर उरलेल्या कचऱ्याचे नियोजन कसे करणार ?

गोवा : पोतुर्गालहून कागदपत्रे आणण्याचे सरकारचे नियोजन स्थगित

सरकारने ही कागदपत्रे लवकरात लवकर गोव्यात आणून सार्वजनिक केल्यास त्यातून वस्तूस्थिती गोमंतकीय जनतेसमोर येईल.

गोवा : दाबोळी, शिरोडा येथे धर्मांध ख्रिस्ती कुटुंबाकडून मंदिरात जाणार्‍या महिलांना शिवीगाळ आणि धमकी

चर्चमध्ये जाणार्‍या महिलांना अशी शिवीगाळ कुणा हिंदूने केली असती, तर याचा राज्यभरात गदारोळ माजला असता आणि भारतात ‘अल्पसंख्यांकांवर अत्याचार’ झाल्याचा टाहो फोडला गेला असता ! ख्रिस्त्यांच्या या कृत्यावर सर्व जण मूग गिळून गप्प !