ख्रिस्ती कुटुंबावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
फोंडा, २१ मे (वार्ता.) – दाबोळी, शिरोडा येथे मंदिरात जाणार्या महिलांना शिवीगाळ करणे, तसेच ग्रामस्थांना धमकी देणे या प्रकरणी मास्कारेन्हस कुटुंबियांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी फोंडा पोलीस ठाण्यात केली आहे. लोकांना धमकावणार्या आणि शिवीगाळ करणार्या या कुटुंबातील महिलांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून लोकांची क्षमा मागायला लावावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. फोंडा पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांना घेराव घातला आणि याविषयी निर्णय होईपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यात ठाण मांडून रहाणार, असे सांगितले. (ग्रामस्थांना अशी चेतावणी का द्यावी लागते ? याचा विचार पोलिसांनी करावा ! – संपादक)
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार दाबोळी येथील स्त्रियांना येथील महादेव मंदिरात जाण्यासाठी मास्कारेन्हस यांच्या घरासमोर असलेल्या वाटेवरून जावे लागते. जेव्हा गावातील महिला या वाटेवरून जातात, तेव्हा मास्कारेन्हस कुटुंबातील महिला त्यांना घाणेरड्या शब्दांत शिवीगाळ करतात, अशी तक्रार या ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
संपादकीय भूमिका
|