तणावाखाली असलेल्या महिला आणि मुले यांच्यासाठी बांबोळी येथे ‘वन स्टॉप सेंटर’ उभारण्याचा शासनाचा निर्णय

तणावाखाली असलेल्या महिला आणि मुले यांच्यासाठी बांबोळी येथे ‘वन स्टॉप सेंटर’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्राच्या योजनेअंतर्गत हे केंद्र उभारले जाणार आहे.

१० वीच्या परीक्षांचा निकाल २८ जुलैला

इयत्ता १० वीच्या परीक्षांचा निकाल २८ जुलै या दिवशी दुपारी ४.३० वाजता घोषित केला जाणार आहे, अशी माहिती गोवा शालांत मंडळाने दिली.

पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात रुग्णालयात भरती

रक्तदाब वाढल्याने पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांना २३ जुलै या दिवशी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले.

‘कृतार्थ म्हार्दोळ’ संघटनेच्या वतीने ‘ऑनलाईन’ श्री गणेश पूजाविधी

गणेशभक्तांची ही अडचण दूर करण्यासाठी ‘कृतार्थ म्हार्दोळ’ या संस्थेने तज्ञ पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष पूजाविधीचे ध्वनीमुद्रण (ऑडिओ) आणि ध्वनीचित्रीकरण (व्हिडीओ) सिद्ध केले आहेत.

‘ऑनलाईन’ शिक्षणासाठी ‘स्मार्टफोन’ न मिळाल्याने नैराश्यातून एकोशी (गोवा) येथील १५ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या

अशा आत्महत्या रोखण्यासाठी मुलांना साधना शिकवणे आवश्यक आहे. साधनेमुळे नैराश्यावर मात करता येत असल्याच्या अनेक अनुभूती साधक विद्यार्थ्यांना येत आहेत !

‘आतंकवादाशी संबंध असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर पूर्णपणे बंदी घाला !’

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेचा आतंकवादाशी संबंध आहे. या संघटनेवर गोव्यात पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी ‘श्री परशुराम सेना’ या राष्ट्रप्रेमी संघटनेने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची २९ मे या दिवशी भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मडगाव येथील ‘कोविड’ रुग्णालयाची क्षमता वाढवतांना १७० खाटांची सोय ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

मडगाव येथील ‘कोविड’ रुग्णालयाच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यात आली आहे. ‘कोविड’ रुग्णालयात आता १७० खाटा असणार, तसेच आवश्यकता भासल्यास एका घंट्याच्या आता अतिरिक्त ३० खाटा वाढवता येणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

‘८ दिवसांत न्याय न दिल्यास आत्महत्या करीन !’ – निलंबित अन्न निरीक्षक राजीव कोरडे यांची शासनाला चेतावणी

अन्न आणि औषध प्रशासनाचे एक प्रामाणिक अधिकारी तथा निरीक्षक राजीव कोरडे यांना ४ मासांपूर्वी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. एका प्रकरणात राजकीय दबावाला बळी न पडल्याने त्यांचे निलंबन केल्याची चर्चा आहे.

कोरोनाच्या वैश्‍विक संकटात दिसलेली दानशूरता !

या सदरात आज गोव्यातील एक पंचायत मंडळ आणि गुरुद्वार कसे साहाय्य करत आहेत, याचा वृत्तांत पाहूया ! कुंडई पंचायत मंडळाकडून साहाय्य आणि आवाहन !

(म्हणे) ‘इस्टरचे जेवण मद्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही !’ – आयरिश रॉड्रीग्स

सामाजिक कार्यकर्ते तथा अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी इस्टरसाठी ११ एप्रिल या दिवशी लोकांना त्यांच्या आवडीचे मद्य विकत घेता यावे, यासाठी काही कालावधीसाठी मद्याची दुकाने उघडी ठेवण्याची मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.