१० वीच्या परीक्षांचा निकाल २८ जुलैला

पणजी, २३ जुलै (वार्ता.) – इयत्ता १० वीच्या परीक्षांचा निकाल २८ जुलै या दिवशी दुपारी ४.३० वाजता घोषित केला जाणार आहे, अशी माहिती गोवा शालांत मंडळाने दिली. राज्यात २१ मे ते ६ जून या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली होती आणि सुमारे १९ सहस्रांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. प्रतिवर्षी एप्रिल मासात होणारी ही परीक्षा कोरोना महामारीमुळे यंदा विलंबाने झाली.