गोवा : मोरजी आणि मांद्रे समुद्रकिनार्‍यांवर संगीत महोत्सव घेण्यास बंदी येणार

मोरजी ते मांद्रे ही समुद्रकिनारपट्टी कासव संवर्धन केंद्र म्हणून घोषित केल्यामुळे या क्षेत्रात यापुढे संगीत महोत्सव आयोजित करण्यास मनाई केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे ॲडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी दिली आहे.

कोरोना महामारीनंतर लहान मुलांच्या मानसिक समस्यांमध्ये वाढ !

मुलांच्या समस्या पाहिल्यास त्यांच्यावर लहानपणापासून साधनेचे संस्कार होणे आवश्यक वाटते ! त्यामुळे सरकारने मानसिक स्तरावरील उपायांसमवेत मुलांवर साधनेचे संस्कार होतील असे पहावे.

लोलये (गोवा) येथील नाल्यातील पाणी जाण्याच्या पाईपमधील गाळ साचल्याची तक्रार ‘ट्विटर’द्वारे नोंदवल्यानंतर कोकण रेल्वेकडून गाळ स्वच्छ !

सध्याच्या काळात ट्विटरचा प्रभावी वापर करून स्थानिक समस्या कशा प्रकारे सोडवू शकतो ? याचे उदाहरण !

आजपासून गोव्यात ‘जी २०’ आरोग्य क्षेत्र कार्यगटाची दुसरी बैठक !

या बैठकीत ‘हेल्थ ट्रॅक’ अंतर्गत निवडण्यात आलेले आरोग्यासंदर्भातील आपत्कालीन स्थितीला प्रतिबंध तसेच औषधनिर्मिती क्षेत्रातील सहकार्य बळकट करणे या विषयांवर प्राधान्यावर चर्चा केली जाणार आहे.

गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजपलाच विजयी करा !

आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर आणि दक्षिण गोवा मतदारसंघांमध्ये भाजपलाच विजयी करावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फर्मागुडी येथे झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज फर्मागुडी येथे सभा

या सभेला २५ सहस्र लोकांची उपस्थिती अपेक्षित असून याद्वारे आगामी लोकसभा निवडणुकीच्या सिद्धतेचे बिगुल वाजणार आहे.

राज्य सरकार प्रतिवर्ष काजू महोत्सव साजरा करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

काजू महोत्सवासारख्या महोत्सवामुळे पर्यटक काजू महोत्सवासाठी गोव्यात येणार आहेत. राज्यातील पर्यटनवृद्धीसाठी स्थानिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. गोव्यातील कला आणि संस्कृती देशपातळीवर नेणे आवश्यक आहे.

‘जी-२०’ आरोग्य क्षेत्र कार्यगटाच्या बैठकीसाठी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी गोव्यात

‘जी-२०’ आरोग्य गटाच्या बैठकीसाठी स्वित्झर्लंड देशातील ७, तर अमेरिकेतील २ प्रतिनिधींचे गोव्यात आगमन झाले. ‘जी-२०’ परिषदेच्या आरोग्य गटाची गोव्यात होणारी ही दुसरी बैठक आहे.

म्हापसा येथील महारुद्र देवस्थानची मंदिर प्रवेश करतांना भारतीय पोशाख घालण्याची भक्तांना सूचना !

गोवा राज्यातील प्रत्येक मंदिरामध्ये पारंपरिक पोशाख बंधनकारक केला पाहिजे, असेच धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

अमित शहा यांच्या गोवा दौर्‍याची सिद्धता अंतिम टप्प्यात

फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात दुपारी ४ वाजता होणार्‍या सभेत गृहमंत्री अमित शहा गोमंतकियांना संबोधित करणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्‍याची सिद्धता युद्धपातळीवर चालू असून ती अंतिम टप्प्यात पोचली आहे.