गोवा : बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुविधांसाठीचा ५०० कोटी रुपयांचा निधी विनावापर पडून !

बांधकाम क्षेत्रात काम करणारे बहुतांश कामगार अत्यंत हालाखीचे जीवन जगत असतांना त्यांच्या कल्याणासाठी देण्यात आलेला ५०० कोटी रुपयांचा निधी सरकारच्या तिजोरीत विनावापर पडून ! ही माहिती स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच दिली !

गोवा : बेतोडा येथे चारचाकी, तर कुंडई येथे कंटेनर उलटून भीषण अपघात

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र चालूच आहे. कुंडई येथे याच ठिकाणी वर्षभरात १०० अपघात घडतात; पण ते रोखण्यासाठी सरकार कोणतीही उपाययोजना करत नाही, असा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे.

गोव्यात ४ वर्षांत बलात्काराची २९९ प्रकरणे; पण केवळ ३ प्रकरणांमध्ये गुन्हेगाराला शिक्षा !

हे एकूणच न्याययंत्रणेचे अपयश म्हणावे लागेल ! ‘उशिराने मिळालेला न्याय हा अन्यायच’, असे म्हटले जाते !

गोवा : विवाहाला नकार दिला; म्हणून युवकाकडून मैत्रिणीचे अश्लील छायाचित्र प्रसारमाध्यमात प्रसारित

नैतिकतेची शिकवण नसल्याने समाजात सामाजिक माध्यमांचा कशा प्रकारे वापर केला जातो, याचे हे आहे उदाहरण ! त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या समवेत समाजाला धर्माचे शिक्षण देणे म्हणजेच साधना शिकवणे किती अपरिहार्य झाले आहे, ते लक्षात येते.

समलिंगी विवाह अयोग्य ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, पीठाधीश्वर, श्रीदत्त पद्मनाभपीठ, कुंडई

आज ज्या प्रकारे समाजात घडामोडी चालू आहेत, त्यातून आमचे संस्कार अल्प पडत आहेत, असे वाटते. संस्कारांची अधोगती होत असल्याचे हे लक्षण आहे. यासाठी लहान मुलांना आपल्या संस्कृतीचे धडे देऊन त्यांच्या मनावर चांगले संस्कार करणे आवश्यक !

गोव्यात गटविकास अधिकारी पदांसाठीच्या सूचीत आयआयटी पदवीधर, पीएच्.डी.धारक आदींचा समावेश

गोवा सार्वजनिक सेवा आयोगाने मागील वर्षी नोव्हेंबर मासात गोवा सरकारच्या ‘पर्सनल डिपार्टमेंट’मध्ये १० गटविकास अधिकारी पदांसाठी विज्ञापन दिले होते. त्यानंतर या पदांसाठी एकूण ४ सहस्र अर्ज आले होते.

गोवा : पोलीस निरीक्षक संध्या गुप्ता यांचे स्थानांतर

अशा पोलिसांवर केवळ स्थानांतर अथवा निलंबन एवढीच कारवाई न करता कठोर कारवाई करायला हवी, तर त्यांच्याकडून गुन्हे तत्परतेने नोंदवले जातील ! अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांचे गुन्हे नोंद करण्यास टाळाटाळ करणारे पोलीस कायदा-सुव्यवस्था काय राखणार ?

गोवा : सर्वाेच्च न्यायालयाचा कॅसिनोचालकांना दणका !

जी आस्थापने संपूर्ण वार्षिक परवाना जमा करणार आहेत, त्यांना याचिका फेटाळल्यास अतिरिक्त व्याज द्यावे लागणार नाही; मात्र जे कॅसिनोचालक ७५ टक्के रक्कम जमा करणार आहेत, त्यांना मात्र याचिका फेटाळली गेल्यास व्याजासह उर्वरित रक्कम द्यावी लागणार !

‘एन्.सी.बी.’कडून गोव्यात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ व्यावसायिकांवर कारवाई

संशयित रशियन ऑलिंपिकपटू श्वेतलाना वर्गानोव्हा या माजी ऑलिंपिकपटू असून तिने वर्ष १९८० मध्ये रौप्यपदक पटकावले होते. संशयित तथा रशियातील निवृत्त पोलीस अधिकारी आंद्रे याचा अमली पदार्थ जगताशी संबंध आहे.

पर्यटकांची लूटमार आणि फसवणूक प्रकरणी गोवा पोलीस आणि पर्यटन खाते यांची संयुक्त कारवाई

पर्यटकांची लूटमार आणि फसवणूक करणार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई केल्यासच त्यांच्यावर वचक बसेल आणि हे प्रकार टळतील !