(म्हणे) ‘भारताला वेळ आल्यावर त्याला नेहमीच आठवणीत राहील असे उत्तर देऊ !’-बिलावट भुट्टो

भारताला उत्तर देण्याची भाषा करणारा पाक किती दिवस देश म्हणून तग धरून रहाणार आहे, हाच खरा प्रश्‍न आहे ! पाकच्या माजी सैन्यदलप्रमुखांनीच स्पष्ट केले आहे की, पाकच्या सैन्याकडे भारताशी लढण्याची क्षमता राहिलेली नाही.

पूर्व किनारपट्टीवर येणार ‘मोचा’ नावाचे चक्रीवादळ !

बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ नावाचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

‘टाइम्स नाऊ नवभरात’च्या महिला पत्रकाराला पंजाब पोलिसांनी केलेल्या अटकेचा पत्रकार संघटनांकडून निषेध

आम आदमी पक्षाची हुकूमशाही ! ‘सामान्य जनतेचा पक्ष’ म्हणून मिरवणारा पक्ष अशा प्रकारे हुकूमशाही करत असल्याने आता जनतेने त्याला त्याची जागा दाखवून द्यावी !

फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान मोदी विशेष अतिथी !

पंतप्रधान मोदी यांच्या या दौर्‍यामुळे सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि आर्थिक सहकार्यासाठी नवीन अन् महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्‍चित करून भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी पुढील टप्प्यात जाण्याची अपेक्षा आहे.

पुनःपुन्हा न्यायालयात याचिका करणार्‍याला सर्वोच्च न्यायालयाने फटकारत १० सहस्र रुपयांचा ठोठावला दंड !

सर्वोच्च न्यायालयाने एका व्यक्तीला निकाली काढण्यात आलेल्या  विषयांवर परत परत याचिका प्रविष्ट केल्यामुळे फटकारले. तसेच तिला १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला. ‘अशा प्रकारच्या याचिका प्रविष्ट करणे वेळेचा अपव्यय करण्यासारखे आहे’, असे न्यायालयाने म्हटले.

समलैंगिकता एक विकृती असून या विवाहाला मान्यता दिल्यास समाजात हा प्रकार वाढीस लागेल ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महिला शाखा

समलिंगी विवाह म्हणजे एक विकार ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेशी संलग्न असलेल्या ‘संवर्धिनी न्यास’ने समलिंगी विवाहाविषयी केलेले सर्वेक्षण !

जन्माने नाही, तर आचरणाने ब्राह्मण होणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

केवळ परशुरामच नव्हे, तर सर्व श्रद्धास्थाने, अवतार आणि देवीदेवता आपल्यासाठी पूजनीय आहेत. त्यामुळे त्या सर्वांच्या प्रतिष्ठा रक्षणाचे दायित्व आपल्यावर आहे.

समलिंगी जोडप्यांच्या समस्या निवारणासाठी केंद्रशासन नेमणार समिती !

समलिंगी विवाहाला भारतात कायदेशीर अनुमती मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रतिदिन सुनवाणी चालू आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या घटनापिठासमोर ही सुनावणी होत असून केंद्रशासनाच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता युक्तीवाद करत आहेत.

जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंगा यांची नियुक्ती

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जागतिक बँकेचे नेतृत्व करण्यासाठी बंगा यांच्या नावाची शिफारस केली होती. या पदासाठी दावेदारी करणारे एकमेव नामांकन केवळ बंगा यांच्याकडून प्रविष्ट झाले होते.

जंतरमंतरवर आंदोलन करणारे कुस्तीपटू आणि पोलीस यांच्यात चकमक : काही जण घायाळ

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना कुस्तीपटू म्हणाले की, हाच दिवस पहाण्यासाठी आम्ही देशासाठी पदक  जिंकले होते का ? आम्ही आमची सर्व पदके सरकारला परत करू.