नवी देहली – समलिंगी विवाहाला भारतात कायदेशीर अनुमती मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रतिदिन सुनवाणी चालू आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या घटनापिठासमोर ही सुनावणी होत असून केंद्रशासनाच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता युक्तीवाद करत आहेत. यासंदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला भूमिका मांडतांना म्हटले की, सरकार या प्रकरणाविषयी सकारात्मक आहे. आम्ही ठरवले आहे की, समलिंगी जोडप्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकापेक्षा अधिक मंत्रालयांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. त्यामुळे कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल. समलिंगी जोडपी किंवा याचिकाकर्ते या समितीकडे जाऊन त्यांचे प्रश्न मांडू शकतात. अधिकाधिक समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही महाधिवक्ता म्हणाले.
#MarriageEquality | Centre confirms it will form a panel to address concerns of same-sex couples at an administrative level: In this edition of Let's Talk Law, @AnushaSoni23 decodes all you need to know about the legal debate in Supreme Court#SameSexMarriage #LGBTQ #LGBTQIA pic.twitter.com/LJNEndFIzF
— News18 (@CNNnews18) May 4, 2023