महाराष्ट्रात शिवसेना-भाजप यांचेच सरकार कायम !

उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिल्यामुळेच राज्यातील सरकार कोसळल्यामुळे राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाला न्यायालयाकडून मान्यता दर्शवण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यमान सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

१० वर्षांनी भारत जागतिक महसत्ता असेल ! – योगऋषी रामदेवबाबा

योग हा राष्ट्रातच नव्हे, तर जगभरात जाईल आणि योगधर्मासमवेतच सनातन धर्माची प्रतिष्ठा संपूर्ण जगात वाढेल. माता-भगिनींना आवाहन करतो की, प्रतिकुल परिस्थितीत, आपत्ती किंवा गंभीर संकटात स्वधर्मापासून डगमगू नका, संयम ठेवा, योग आत्मसात करा, सर्व अडथळे दूर होतील.

तीन राज्यांचा समलिंगी विवाहाला विरोध ! – केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. संजय किशन कौल, न्या. एस्.आर्. भट, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी.एस्. नरसिंह यांच्या घटनापिठासमोर या खटल्याची सुनावणी चालू आहे.

अस्थिर पाकिस्तान भारतासाठी धोकादायक !

फारूख अब्दुल्ला यांचे पाकधार्जिणे विधान

‘सिर्फ एक बंदा काफी है’ चित्रपटाच्या निर्मात्याला ‘आसाराम बापू ट्रस्ट’कडून नोटीस

चित्रपटातून पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांचा अवमान केल्याचा दावा

(म्हणे) ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये अराजकता पसरवत आहेत !’ – पाक अभिनेत्री सहर शिनवारी

पाकमधील राजकारणीच नव्हे, तर खेळाडू, कलाकार आदी सर्वांच्याच मनात भारतद्वेष किती भिनला आहे, हेच यावरून लक्षात येते !

भारत आखाती देशांशी थेट रेल्वे जाळे निर्माण करण्याच्या प्रयत्नात !

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर असून तेथे त्यांनी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांच्यासह संयुक्त अरब अमिरात यांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली.

तिहार कारागृह प्रशासनाने गुंड टिल्लू ताजपुरिया याला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही ? – देहली उच्च न्यायालय

तिहार कारागृह प्रशासनाने गुंड टिल्लू ताजपुरिया याला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही ?, असा प्रश्‍न देहली उच्च न्यायालयाने तिहार कारागृहाच्या प्रशासनाला विचारला. काही दिवसांपूर्वी गुंड टिल्लू ताजपुरिया याची तिहार कारागृहात अन्य गुंडांनी हत्या केली होती.

साम्यवाद्यांनी माझ्या जीवनातील २० वर्षे नष्ट केली ! – अभिनेते पीयूष मिश्रा  

साम्यवादी विचारसरणी जगात येऊन १०० वर्षे झाली आणि जगातून आता तिचे अस्तित्व नष्ट होत चालले आहे. ‘असे का झाले ?’, हे मिश्रा यांच्या विधानांवरून लक्षात येते ! देवाला न मानणार्‍यांची हीच गत होते, हे पुन्हा सिद्ध होते !