व्यायाम करण्याचा कंटाळा येत आहे ? मग हे करा !
व्यायाम करतांना आपल्या शरिराला त्रास होतोच; पण त्यामुळे इच्छित पालट घडवण्याची उत्तेजना शरिराला मिळते.
व्यायाम करतांना आपल्या शरिराला त्रास होतोच; पण त्यामुळे इच्छित पालट घडवण्याची उत्तेजना शरिराला मिळते.
आरोग्यमय जीवन जगण्यासाठी व्यायामाची आवश्यकता, त्याचे महत्त्व आणि त्याविषयीचे शंकानिरसन !
सध्याच्या काळात बर्याचदा स्वतःच्या आहारात आढळणार्या विरुद्ध आहाराची सूची येथे देत आहे. उत्तम आरोग्याची इच्छा असल्यास हे पदार्थ टाळणे इष्ट !
मुळात जेव्हा तुम्ही अन्न, हवा आणि पाणी या मूळ गोष्टींवर अवलंबून असता तिथेच भेसळ असली की, आजारपण कुणालाच चुकत नाही, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना सुद्धा ! म्हणूनच आपली आजी जशी छान राहिली, तसे रहायला …
जगाच्या आधुनिकीकरणाच्या समवेत उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. आजकाल याविषयी बरीच चर्चा होत आहे आणि त्याविषयी जागरूकताही निर्माण झाली आहे…
प्रत्येक वेळी पाठ किंवा कंबर आखडणे किंवा पटकन ‘क्रॅम्प’ येणे, हे वाताचे लक्षण असतेच, असे नाही. उलट बर्याचदा अशा रुग्णांमध्ये आम्लपित्ताचा इतिहास, ३-४ दिवसांत आंबवलेले किंवा चायनीज वा पाणीपुरी यांसारखे आंबट-खारट पदार्थ आणि व्यायामाचा अभाव हे प्रामुख्याने असतात.
पोट साफ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. त्यासाठी त्रिफळा किंवा विकत आणलेल्या विविध पावडर न घेता पोट साफ होण्यासाठी वेगच येत नसल्यास, तसेच अग्नी चांगला ठेवण्यासाठी हलका आहार अन् खाण्याची पथ्ये शक्यतो पाळावीत.
‘अग्नी नीट असता निरोगी जीवन मिळते आणि तो नीट नसल्यास सर्व रोगांचा संभव होऊ शकतो’, हे आयुर्वेदात सांगितले आहे.
‘रोग किंवा विकार होऊ नये, यासाठी दैनंदिन जीवनात आहार, विहार (क्रिया) इत्यादी कसे असले पाहिजे’, हे प्रत्येक मानवाला ज्ञात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.