छत्रपती शिवरायांचा आदर्श असतांनाही हिंदूंवर अत्याचार होणे ही शोकांतिका ! – धनंजय गद्रेगुरुजी, प्रसिद्ध कीर्तनकार

  • पाली (रायगड) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन

  • बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्याची संघटनांची मागणी

(AI निर्मित छायाचित्र)

पाली (रायगड) – हिंदू असंघटित असल्याने त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. संख्याबळ न्यून असतांनाही बलाढ्य शत्रूंना पराभूत करून हिंदवी स्वराज्य स्थापन करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आपल्यासमोर आहे; पण तरीही हिंदूंवर अत्याचाराची वेळ येणे, ही शोकांतिका आहे.

श्री. धनंजय गद्रेगुरुजी

हिंदूंनी केवळ सण किंवा महापुरुषांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र न येता हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात कृतीच्या स्तरावर संघटित विरोध करायला हवा, असे उद्गार प्रसिद्ध कीर्तनकार श्री. धनंजय गद्रेगुरुजी यांनी काढले.

बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात सहभागी हिंदु

या वेळी हिंदु जनजागृती समितीसह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, शिवसेना, ब्राह्मण सेवा संघ, मराठा समाज सुधागड पाली, राष्ट्रीय वारकरी परिषद, बजरंग दल आणि हिंदु रक्षक सेना या संघटना सहभागी झाल्या होत्या.

पालीचे नगराध्यक्ष श्री. पराग मेहता, प्रसिद्ध कीर्तनकार श्री. धनंजय गद्रेगुरुजी, शिवसेनेचे श्री. राजेंद्र राऊत, धर्मरक्षक हिंदु सेनेचे श्री. तुषार मोरे, धारकरी श्री. रोहित वाळज आणि श्री. सौरभ जांभेकर उपस्थित होते. काही मान्यवरांनी आंदोलनात संबोधन केले.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी बांगलादेशामध्ये अल्पसंख्यांक हिंदु समाजावर होत असलेल्या अत्याचारांचे क्रूर वास्तव उपस्थितांसमोर मांडले.

श्री. सुनील कदम

शिवसेनेचे श्री. राजेंद्र राऊत म्हणाले,

श्री. राजेंद्र राऊत
श्री. राजेंद्र राऊत

‘‘हिंदु जनजागृती समितीने सर्व संघटनांना आंदोलनाच्या माध्यमातून संघटित केले. यापुढेही आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी एकत्र येऊन कार्य करू.’’

धर्मरक्षक हिंदु सेनेचे श्री. तुषार मोरे म्हणाले, ‘‘बांगलादेशी हिंदूंवर होणार्‍या आघातांना रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, अन्यथा हिंदु समाज तीव्र आंदोलन करील.’’

‘बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग डोळ्यांसमोर ठेवून हिंदूंचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे’,

श्री रोहित वाळज
श्री रोहित वाळज

असे विधान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. रोहित वाळज आणि सौरभ जांभेकर यांनी केले.

सुधागडच्या तहसीलदारांना निवेदन !

तहसीलदार उत्तम कुंभार यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखण्याविषयीचे निवेदन सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार यांना हिंदुत्वनिष्ठांनी दिले.
‘बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी सरकारने शक्य ती पावले उचलावीत’, असे निवेदनात म्हटले आहे.

आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे केलेल्या मागण्या !

१. बांगलादेशातील हिंदुविरोधी घटनांचा तीव्र निषेध नोंदवून दीपू चंद्र दास यांच्या हत्येसह अशा सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करावी.

२. गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्यासह पीडित कुटुंबांना भरपाईची तातडीची लेखी हमी बांगलादेशाकडून घ्यावी.

३. हिंदु, बौद्ध, ख्रिस्ती आदी अल्पसंख्याकांचे धार्मिक स्वातंत्र्य आणि मंदिरांची सुरक्षा यांसाठी स्वतंत्र करार करावा अन् त्याच्या कार्यवाहीसाठी संयुक्त समिती स्थापन करावी.

४. बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचार अधिकृत आकडेवारीसह मांडून ‘फॅक्ट फाइंडिंग मिशन’ची मागणी करावी.

५. छळग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी.

बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचार विषयीचे सविस्तर वृत्त वाचा :