विधवा हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात २४ घंट्यांत २ हिंदूंची हत्या करण्यात आली, तर एका विधवा हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यासह एका हिंदु महिला जिल्हाधिकारीच्या विरोधात आंदोलन करत त्यांना धमक्या देण्यात आल्या.
ट्विट्स पाहण्यासाठी खालील चित्रांवर क्लिक करा ↓↓↓
![]() |
![]() |
दुकानदार शरत चक्रवर्ती मणि यांची हत्या
बांगलादेशातील नरसिंगदी जिल्ह्यात ५ जानेवारीच्या रात्री शरत चक्रवर्ती मणि (वय ४० वर्षे) या हिंदु दुकानदाराची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. शरत चक्रवर्ती मणि चारसिंदूर बाजारात किराणा होते. ते दुकानात असतांना अचानक आलेल्या अज्ञात आक्रमणकर्त्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी आक्रमण केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर घायाळ झालेल्या मणि यांना रुग्णालयात नेले जात होते; परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
स्थानिक माध्यमांनुसार १९ डिसेंबर या दिवशी मणि यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून देशातील वाढत्या हिंसेवियी चिंता व्यक्त केली होती आणि त्यांच्या परिसराला ‘मृत्यूची दरी’ असे म्हटले होते.
🚨A human chain was organized this afternoon by "Charsindoor Bazaar Byabshayi Samity" and local Hindus in protest of last night's gruesome murder of Hindu trader Sarat Chakraborty Mani (48). pic.twitter.com/8gxj3aSIpk
— Salah Uddin Shoaib Choudhury (@salah_shoaib) January 6, 2026
राणा प्रताप बैरागी यांची गोळ्या झाडून हत्या
५ जानेवारीलाच जेसोर जिल्ह्यातही राणा प्रताप बैरागी या हिंदु व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बैरागी मोनिरामपूर परिसरात बर्फाच्या कारखान्याचे मालक होते. ते दैनिक ‘बीडी खबर’ वृत्तपत्राचे कार्यकारी संपादकही होते.
#BreakingNews: Another Hindu youth killed in Bangladesh!
A Hindu youth named Rana Pratap Bairagi was shot dead by miscreants in Monirampur upazila under Jessore district in Bangladesh. The incident took place today at noon today. pic.twitter.com/MlewUvcz0i
— Salah Uddin Shoaib Choudhury (@salah_shoaib) January 5, 2026
मोटारसायकलवर आलेल्या ३ आरोपींनी त्यांना कारखान्यातून बाहेर बोलावून एका गल्लीत नेले आणि डोक्यात जवळून गोळी झाडून पळून गेले. बैरागी यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
#BreakingNews: Sixth Hindu man killed in Bangladesh!
Within hours of the murder of Rana Pratap Bairagi, another Hindu has been killed in Bangladesh.
On January 5, 2026 at around 10 pm, a Hindu shop owner Moni Chakraborty was suddenly attacked by miscreants with sharp weapons… pic.twitter.com/jkMlpC0S0E
— Salah Uddin Shoaib Choudhury (@salah_shoaib) January 5, 2026
हिंदु विधवेवर सामूहिक बलात्कार करून झाडाला बांधून मारहाण !
बांगलादेशातील झेनाइदह जिल्ह्यातील कालीगंज परिसरात ४४ वर्षांच्या एका हिंदु विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपींनी बलात्कारांनंतर तिला झाडाला बांधून मारहाण केली. या महिलेचे केस कापण्यात आले, तिला मारहाण करण्यात आली आणि संपूर्ण घटनेचे भ्रमणभाषवर चित्रीकरण करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी हसन या आरोपीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध चालू आहे. हसन याच परिसरातील एका गावातील रहिवासी आहे.

नातेवाइकांना खोलीत कोंडून बलात्कार केला
पोलीस आणि स्थानिक लोक यांच्या म्हणण्यानुसार, महिलेने अनुमाने २ वर्षांपूर्वी गावात एक घर आणि भूमी खरेदी केली होती. ही भूमी तिने आरोपी शाहीनच्या भावाकडून घेतली होती. भूमी खरेदी केल्यापासून शाहीन तिला सतत त्रास देत होता आणि तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. महिलेचे दोन पुरुष नातेवाईक ३ जानेवारीला संध्याकाळी तिला भेटायला आले होते. त्याचवेळी शाहीन आणि हसन बलपूर्वक घरात घुसले. त्यांनी महिलेच्या नातेवाइकांना एका खोलीत कोंडून ठेवले आणि महिलेला दुसर्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपींनी महिला आणि तिचे नातेवाईक यांना घरातून बाहेर काढून झाडाला बांधले आणि त्यांच्यावर अश्लील कृत्यांचा खोटा आरोप केला.
हिंदु महिला जिल्हाधिकार्यांना धमक्या
१२ फेब्रुवारीला होणार्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जमात-ए-इस्लामी पक्षाच्या उमेदवार बैरिस्टर सालेही यांचा अर्ज कुरिग्राम-३ मतदारसंघातील जिल्हाधिकारी अन्नपूर्णा देबनाथ यांनी रहित केला. सालेही यांच्याकडे २ देशांचे नागरिकत्व असल्यामुळे त्यांचा अर्ज रहित करण्यात आला; मात्र अर्ज रहित झाल्यानंतर सालेही यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन केले. या वेळी या समर्थकांनी अपशब्द म्हणत देबनाथ यांच्या त्यागपत्राची मागणी केली. तसेच ‘तू इथे राहू शकत नाहीस’ अशी धमकीही दिली. काही समर्थकांनी त्यांना इस्कॉनशी संबंधित आणि भारत अन् सत्ताधारी पक्षाच्या हितासाठी काम करणारी व्यक्ती असल्याचे आरोपही केले.
संपादकीय भूमिका
|


महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ