न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्‍या महिलेला अटक

मंजुला

चिक्कबल्लापूर (कर्नाटक) – येथे ६५ वर्षीय मंजुला नावाच्या महिलेला न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ९ जुलै सकाळी ९:४० वाजता न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी यांच्या न्यायालयात ही घटना घडली. महिलेने न्यायालयात प्रवेश केला आणि न्यायाधिशांच्या टेबलावर ‘पूजा’ केलेले पांढरे मोहरीचे दाणे विखुरले, असा आरोप आहे. निकाल स्वतःच्या बाजूने लागण्यासाठी तिने दाणे विखुरल्याचे म्हटले जात आहे.