धोकादायक भ्रम दूर करा : आतंकवाद हा विचारसरणीवर चालतो, परिस्थितीवर नाही !

जिहादी विचारसरणी विरुद्ध सनातन धर्माचे आचरण !

देहली येथे नुकत्याच झालेल्या बाँबस्फोटाने आणि संपूर्ण भारतात अनेक आतंकवादी ‘मॉड्यूल्स’ (गट) उघडकीस आल्याने पुन्हा एकदा जिहादी आतंकवादाचे गंभीर वास्तव उघड झाले आहे. भारत अनेक दशकांपासून या धोक्याचा सामना करत आला आहे, तरीही प्रत्येक वेळी जेव्हा आतंकवादी आक्रमण होते, तेव्हा तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आणि स्वयंघोषित बुद्धीवादी ‘आतंकवादाला कोणताही धर्म नसतो’ अन् ‘हे तरुण गरिबी, निरक्षरता, बेरोजगारी अन् उपेक्षितता यांमुळे हिंसाचाराला प्रवृत्त होतात’, या जुन्या थकलेल्या संहितेसह वा कथानकांसह पुढे सरसावतात.

१. जुन्या कथानकाचे पतन

देहलीतील कटाच्या अलीकडील अन्वेषणातून ‘गरिबी आणि निरक्षरता यांमुळे आतंकवादी निर्माण होतात’, हे कथानक खरोखरच किती कमकुवत आहे, हे उघड झाले आहे. या आतंकवादी षड्यंत्रामध्ये सहभागी असलेले डॉक्टर प्रतिष्ठित रुग्णालयांमध्ये काम करत होते आणि भरीव वेतन मिळवत होते. ते गरीब अशिक्षित, बेरोजगार नव्हते. त्यांना मुख्य प्रवाहातून वगळण्यात आलेले नव्हते. त्यांना एकत्र आणणारा एक घटक, म्हणजे विचारसरणी-जिहादी विचारसरणी. हिंदूंचा नाश करून भारतावर विजय मिळवून ‘गजवा-ए-हिंद’चा (भारताचे इस्लामीकरण करण्यासाठीचे युद्ध) उघडपणे पुरस्कार करणारी विचारसरणी.

डॉ. उज्ज्वल कापडिया

२. डॉ. उमर नबीचा व्हिडिओ हा आतापर्यंतचा सर्वांत स्पष्ट पुरावा

देहली बाँबस्फोटामागील आत्मघातकी आक्रमण करणारा डॉ. उमर नबी याच्या अलीकडील व्हिडिओपेक्षा या हिंसाचाराचे वैचारिक स्वरूप अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करणारे दुसरे काहीही नाही. तो उच्च शिक्षण झालेला, रोजगार असलेला, आरामदायी जीवन जगणारा आणि सन्माननीय व्यवसाय असलेला एक व्यक्ती होता, तरीही आक्रमण करण्यापूर्वी त्याने स्वतःच रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये आत्मघातकी बाँबस्फोट ही ‘चुकीची संकल्पना’ म्हणून तर्कशुद्ध करून आणि ‘हौतात्म्य’ म्हणून त्याचे उदात्तीकरण केले आहे. हा गरिबीचा किंवा उपेक्षिततेचा आवाज नाही, तर वैचारिक कट्टरतावादाचा आवाज आहे. यातून हे अतिशय स्पष्टपणे सिद्ध होते की, अशा व्यक्तींना वंचितता नव्हे, तर जिहादी विचारसरणी कृती करण्यास प्रेरित करते.

३. ‘गरिबी किंवा उपेक्षितता यांमुळे आतंकवाद निर्माण होत नाही’, याचे काश्मिरी हिंदू हे मोठे उदाहरण

काश्मीरमधून बळजोरीने केलेले काश्मिरी हिंदूंचे स्थलांतर हा भारताच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. या हिंदूंना ज्या हिंसाचाराला आणि रानटीपणाला सामोरे जावे लागले, ते शब्दांत सांगता येणार नाही. सहस्रो जणांची त्यांच्या कुटुंबियांसमोर हत्या करण्यात आली, महिलांवर बलात्कार करण्यात आले. या अत्याचारांमध्ये लहान मुलांनाही सोडण्यात आले नाही. एका रात्रीत सर्व कुटुंबियांना त्यांच्या नेसलेल्या वस्त्रानिशी आणि जगण्याची कोणतीही आशा नसतांना त्यांची घरे सोडावी लागली अन् जम्मू, देहली, तसेच इतर ठिकाणच्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये जावे लागले. जर ‘झालेले अत्याचार आणि हानी यांमुळे आपोआप आतंकवाद्यांची निर्मिती झाली’, असे म्हटले, तर काश्मिरी हिंदूंमधून सहस्रो आतंकवादी निर्माण झाले असते; परंतु त्यांच्यापैकी एकही आतंकवादी झाला नाही. तीव्र हिंसाचार, अपमान, गरिबी आणि त्यांचे सामाजिक अन् आध्यात्मिक जग अगदी कोसळूनही त्यांनी कधीही आतंकवाद किंवा त्यांच्यावर आक्रमण करणार्‍या गुन्हेगारांचा सूड घेणे, हा मार्ग निवडला नाही. या एकमेव ऐतिहासिक सत्यातून गरिबी किंवा उपेक्षितता यांमुळे आतंकवाद निर्माण होतो, हा दावा निरर्थक असल्याचे स्पष्ट होते.

शांतता म्हणजे आता तटस्थता, शरणागती नव्हे !

४. सनातन धर्माची तत्त्वे हाच आमच्या संस्कृतीचा पाया !

जर अत्याचार झाल्यामुळे आतंकवादी निर्माण झाले असते, तर दक्षिण आशियामध्ये आतंकवाद्यांमध्ये काश्मिरी हिंदू हा सर्वांत मोठा आतंकवादी गट ठरला असता; परंतु त्यांनी तसे केले नाही; कारण ते आतंकवाद निर्माण करणार्‍या विचारसरणीला पाठिंबा देत नाहीत. याउलट त्यांनी सर्वसमावेशक, सहनशीलता आणि मूलतः शांततामय सनातन धर्माच्या संस्कृतीची मूल्ये पाळली. हे जिहादी मानसिकतेच्या भयानक बहिष्कारवादाच्या अगदी विरुद्ध आहे.

५. वैचारिक विभाजनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही !

आतंकवादी विचारसरणी ही घटनांची वा अत्याचारांची प्रतिक्रिया नसून ती मुद्दामहून केलेली सैद्धांतिक मांडणी आहे. याउलट सनातन धर्म संस्कृती अनेक तत्त्ववाद, आत्मसंयम आणि शांततापूर्ण सहअस्तित्व यांमध्ये रुजलेली आहे. या दोघांना एकत्र करणे, त्यांपैकी एक सामाजिक आणि आर्थिक उत्पादन आहे, असे म्हणणे, म्हणजे बौद्धीक दृष्टीने अप्रामाणिकपणा अन् सभ्यतेची तोडफोड केल्यासारखे होईल, ज्याच्या साहाय्याने हे आतंकवादी हिंदूंविरुद्ध युद्ध पुकारत आहेत, त्या वैचारिक स्पष्टतेकडे दुर्लक्ष करणे आपल्याला परवडणार नाही.

शांततेमुळे हिंदु संस्कृतीची किंमत मोजावी लागेल.

६. आता आपण काय केले पाहिजे ?

विचारसरणी ओळखली पाहिजे. भ्रम आहे तो नाकारला पाहिजे आणि संस्कृतीचे रक्षण केले पाहिजे. या विचारसरणीमुळे निर्माण झालेला अस्तित्वाचा धोका राष्ट्राने ओळखण्याची ही वेळ आहे. तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी, बुद्धीवादी आणि स्वयंघोषित विचारवंत यांनी जिहादी आतंकवादाचे समर्थन किंवा तो आतंकवाद सौम्य करणे, यांसाठी आधारहीन युक्तीवाद करून पसरवलेला भ्रम नाकारण्याची ही वेळ आहे. वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून दारु पिणारे हे बुद्धीवादी अशा प्रकारच्या हिंसाचाराला क्षमा करतात किंवा त्याचे समर्थन करतात, ते थेटपणे आणि ठामपणे उघड केले पाहिजे. राजकारणा सारखा हा विषय राहिलेला नाही. हा हिंदु संस्कृतीच्या अस्तित्वाचा विषय आहे. प्रत्येक नागरिकाने या धोक्याविषयीचे गांभीर्य ओळखले पाहिजे.

७. अंतिम चेतावणी

शांतता म्हणजे आता तटस्थता, शरणागती नव्हे ! अन्यथा शांततेमुळे आम्हाला हिंदु संस्कृतीची किंमत मोजावी लागेल.

– डॉ. उज्ज्वल कापडिया, फोंडा, गोवा. (२०.११.२०२५)