(म्हणे) ‘पाकिस्तानमध्ये मला घरच्यासारखे वाटते !’ – Sam Pitroda

भारताबाहेरीर काँग्रेसच्या शाखेचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचे पाकप्रेमी विधान !

सॅम पित्रोदा

नवी देहली – माझ्या मते आपले परराष्ट्र धोरण आधी शेजार्‍यांवर केंद्रित असले पाहिजे. आपण खरोखर शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारू शकतो का ? मी पाकिस्तानला गेलो आहे. मी सांगू इच्छितो की, तिथे मला घरच्यासारखे वाटले.

मी बांगलादेश आणि नेपाळलाही गेलो आहे आणि तिथेही मला घरच्यासारखेच वाटले. मला असे वाटले नाही की, मी परदेशी भूमीवर आहे, असे विधान इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे (भारताबाहेरील काँग्रेसच्या शाखेचे) प्रमुख सॅम पित्रोदा यांनी केले. त्यांच्या या विधानावर भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

यामुळेच मुंबईवरील आक्रमणानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने पाकवर कारवाई केली नाही ! – भाजप

भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले की, राहुल गांधी यांचे विश्वासू आणि काँग्रेसचे परराष्ट्र प्रमुख सॅम पित्रोदा म्हणतात त्यांना पाकिस्तानमध्ये घरासारखे वाटते. त्यामुळेच आश्चर्य नाही की, काँग्रेस सरकारने मुंबईवरील आतंकवादी आक्रमणानंतर पाकिस्तानविरुद्ध कठोर पाऊल उचलले नाही.

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तान घरच्यासारखे वाटते, तर काँग्रेसने तिच्या सत्ताकाळात पाकला भारताशी जोडण्यासाठी प्रयत्न का केला नाही ?
  • आता जर पित्रोदा यांना पाक घरच्यासारखे वाटत असेल, तर त्यांनी भारतात रहाण्याऐवजी पाकमध्ये रहावे, असेच भारतियांना वाटते !