Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्‍या आझमविरुद्ध गुन्हा नोंद

AI निर्मित चित्र

रुद्रपूर (उत्तराखंड) – येथे आझम नावाचा मुसलमान मागील २ वर्षांपासून एका महिला डॉक्टरची छेड काढत असल्याची तक्रार पीडित महिला डॉक्टरने केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी गेल्या २ वर्षांपासून तिचा पाठलाग करीत होता आणि तिला एकटे पाहून अश्लील कृत्ये करत होता. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध चालू केला आहे.

१. पीडित महिला डॉक्टर म्हणाली की, ती ६ वर्षांपूर्वी उधमसिंह नगरहून रुद्रपूर येथे रहाण्यासाठी आली. गेल्या ३ वर्षांपासून ती रुद्रपूरमधील एका खासगी रुग्णालयात नेत्रतज्ञ म्हणून कार्यरत आहे. महिला डॉक्टरने सांगितले की, अनुमाने ५ – ६ वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिची सितारगंज येथील रहिवासी असलेल्या आझम नावाच्या युवकाशी मैत्री झाली होती.

२. आरोपी हा महिला डॉक्टरच्या घराजवळच रहात असल्याने त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि ते फोनवरही बोलू लागले; मात्र आझमच्या विचित्र वागणुकीला कंटाळून महिला डॉक्टरने गेल्या २ वर्षांपासून त्याच्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले होते.

३. संवाद बंद केल्यानंतरही आझम महिला डॉक्टरचा पिच्छा सोडत नव्हता. तो सतत डॉक्टरला फोन करून पुन्हा मैत्री करण्यासाठी दबाव आणत होता. इतकेच नाही, तर तो डॉक्टरचा रुग्णालयात जाण्याच्या रस्त्यावरही पाठलाग करू लागला.

४. डॉक्टरने सांगितले की, तो तिच्या केबिनपर्यंत (ऑफिस) यायचा आणि तिला एकटे पाहून आक्षेपार्ह कृत्य करायचा. या त्रासाला कंटाळून डॉक्टर मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती आणि तिला असुरक्षित वाटू लागले होते.

५. शेवटी पीडितेने रुद्रपूर कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी आझमविरुद्ध लेखी तक्रार केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपी आझमच्या अटकेसाठी विविध ठिकाणी घाड घालत आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदु मुली, युवती आणि महिला यांच्याकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धर्मांध मुसलमानांचे दुःसाहस होणार नाही, यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !