पीडित तरुणीचे मुसलमान नावाने बनवले बनावट आधारकार्ड !

दौसा (राजस्थान) – येथील एका हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ३ मुसलमान तरुणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी पीडित तरुणीचे एक बनावट आधारकार्डही बनवून त्यामध्ये हिंदु तरुणीचे नाव पालटून ‘मुस्कान खान’ असे करण्यात आले होते. पोलिसांनी बनावट आधारकार्ड बनवणार्या आरोपीलाही अटक केली आहे.
१. आरोपी वकील खान याने पीडित तरुणीला भ्रमणभाष दुरुस्तीच्या निमित्ताने लालसोट येथे बोलावले. आरोपीने तिला अंमली पदार्थ मिसळलेले सरबत प्यायला देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर बेशुद्धावस्थेत त्याने तिच्यावर बलात्कार केला.
२. आरोपीने बलात्काराचा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर तो व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन तो वारंवार तिच्यावर बलात्कार करत राहिला.
३. आरोपी वकील खानने त्याच्या ओळखीच्या राहिल आणि नयाब खान यांनाही बलात्कार करायला सांगितले. त्यानुसार त्यांनीही बलात्कार केला.
४. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी वकील खान, राहिल आणि नयाब खान यांना अटक केली.
५. पोलिसांनी पीडित हिंदु तरुणीचे बनावट आधारकार्ड बनवल्याप्रकरणी बौंली येथील रहिवासी नदीम अन्सारी याला अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले
Badrinath Donation Theft : बद्रीनाथ धाममधील चोरीच्या प्रकरणी एकास अटक
धर्माच्या नावावर नद्या प्रदूषित करण्याचा कुणालाही अधिकार नाही ! : Madras High Court
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद
तमिळनाडूमध्ये गाय आणि वासरू यांच्या हत्येवर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीला सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती
एक खरा हिंदु सर्वांना समानतेची वागणूक देतो ! : Annamalai