France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले

चारचाकी वाहनातून जप्त केली शस्त्रे

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समधील ज्यू धर्मियांवर होणारे एक संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. पॅरिसच्या उत्तरेला असलेल्या सार्सेल्स  भागात पोलिसांना एका चारचाकी गाडी आढळून आली. यात एक रायफल आणि एक बंदूक आढळून आली. या भागात मोठ्या संख्येने ज्यू समुदाय रहातो. चारचाकी सापडलेल्या जागेजवळ एक चित्रपटगृह आणि अनेक उपाहारगृहे आहेत. यातून ३०० हून अधिक लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी हालवण्यात आले.