हिंदूंना ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास आजार आणि गरीबी दूर होण्याचे सांगणारे ‘जगात आजारी आणि गरीब ख्रिस्ती नाहीत’, असे सांगतील का ?

‘छत्तीसगडमधील बिलासपूर येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांची धर्मांतराची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. श्रीरामनवमीच्या दिवशी बहतराई येथे प्रार्थनासभेच्या नावाखाली चाललेला हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हिंदु संघटनांनी हाणून पाडला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाद्री दीपक सिंह सिदार याच्यासह ६ जणांना अटक केली. ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास आजार आणि गरीबी दूर होण्याचा दावा ते करत होते.’ (१०.४.२०२५)