Manipur Waqf Bill Protest : मणीपूरमध्ये सहस्रो मुसलमानांनी भाजपच्या नेत्याच्या घराची तोडफोड करून घर पेटवले !

वक्फ सुधारणा कायद्याला समर्थन दिल्यानंतरची घटना

इम्फाळ (मणीपूर) – मणीपूरमध्येही वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन चालू आहे. राज्यातील थौबल जिल्ह्यातील लिलोंग येथे मुसलमानांकडून एक मोर्चा करढण्यात आला होता. यात ५ सहस्रांहून अधिक लोक सहभागी झाले होते. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १०२ वर वाहतूक विस्कळीत झाली. काही ठिकाणी आंदोलक आणि सुरक्षादल यांमध्ये चकमकी झाल्या. या वेळी भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या मणीपूर शाखेचे अध्यक्ष अस्कर अली यांच्या घराची तोडफोड करून ते मुसलमान आंदोलनकर्त्यांनी पेटवून दिले. अस्कर अली यांनी वक्फ सुधारणा कायद्याला पाठिंबा दिला होता. या घटनेनंतर अली यांनी सामाजिक माध्यमांत व्हिडिओ प्रसारित करत कायद्याला समर्थन केल्यावरून क्षमा मागितली. इम्फाळ पूर्वेतील मुसलमानबहुल भागांतही आंदोलने करण्यात आली.

संपादकीय भूमिका

  • देशात कायदे असतांना त्यांचे उल्लंघन करून उघडपणे हिंसाचार करणारे मुसलमान ! अशांवर कारवाई करण्याची मागणी देशातील एकही तथाकथित निधर्मीवादी राजकीय पक्ष आणि त्याचे नेते करणार नाहीत; कारण आक्रमण करणारे मुसलमान आहेत !
  • राजकीय पक्षांकडून ज्या राज्यघटनेची वेळोवेळी जाणीव करून दिली जाते, त्याच राज्यघटनेचे तीन तेरा करणारे दंगलखोर मुसलमान !