Mithun Chakraborty On Ram Rajya : बंगालमध्ये ९ टक्के हिंदू जरी एकत्र आले, तरी रामराज्य येईल !

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि भाजपचे नेते मिथुन चक्रवर्ती यांचे विधान

चित्रपट अभिनेते आणि भाजपचे नेते मिथुन चक्रवर्ती

उत्तर २४ परगणा (बंगाल) – जर बंगालमधील ते ९ टक्के हिंदू मतदार, जे सहसा मतदान करत नाहीत, त्यांनी पुढे येऊन भाजपला पाठिंबा दिला, तर राज्यात ‘रामराज्य’ स्थापित होऊ शकते, असे विधान प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि भाजपचे नेते मिथुन चक्रवर्ती यांनी बारासत येथे श्रीरामनवमीच्या वेळी केले. ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार हेही उपस्थित होते.

बंगाली हिंदूंसाठी बांगलादेशासारखी स्थिती निर्माण होईल !

मिथुन चक्रवर्ती यांनी काही दिवसांपूर्वी बराकपूरमध्येही अशाच प्रकारचे विधान केले होते. ते म्हणाले होते की, जर वर्ष २०२६ मध्ये भाजपला राज्यातील विधानसभेची निवडणूक जिंकता आली नाही, तर बंगाली हिंदूंसाठी बांगलादेशासारखी स्थिती निर्माण होईल. जर आपण (भाजप) जिंकलो नाही, तर बंगालमधील हिंदूंसाठी परिस्थिती आणखी कठीण होऊ शकते. भाजपसमर्थक बंगाली हिंदू सुरक्षित रहाणार नाहीत. जर पुन्हा आहे तेच लोक सत्तेत आले, तर ते आपल्याला सोडणार नाहीत. त्यामुळे बंगालमधील हिंदूंनी आताच कृती करावी, अन्यथा फार विलंब होऊ शकतो.

संपादकीय भूमिका

बंगालमध्ये प्रथम राष्ट्रपती राजवट लागू करून हिंदूंचे आणि देशाचे रक्षण केले पाहिजे !