
मल्याळम् अभिनेते मोहनलाल यांची प्रमुख भूमिका असलेला ‘एल् २ -‘एम्पुरान’ हा चित्रपट सध्या प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील अनेक दृश्ये आणि प्रसंग यांमध्ये हिंदूंना जाणीवपूर्वक खलनायक अन् मुसलमानांवर अत्याचार करणारे असे दाखवून त्यात मुसलमानांचे उदात्तीकरण केलेले दाखवले आहे. गुजरात दंगलीतील काही कथानके वापरून त्याचा आताच्या काळाशी संबंध जोडून ‘देवदूत किंवा देव काही करू शकत नाहीत, तेव्हा सैतान’, म्हणजे ‘एम्पूरन’चा नायक कुरेशी अबराम (ज्याला स्टीफन नेडपल्ली म्हणूनही चित्रपटात ओळखले जाते.) जो एका चर्चमध्ये मोठा होतो, तो शेवटी हिंदु नेता ‘बजरंगी’ याला कशा रितीने ठार मारतो ?, हे पडद्यावर दाखवण्यात आले आहे.
‘या चित्रपटातील सर्व प्रसंग, कथा काल्पनिक आहे’, अशी सूचना प्रारंभी येत असली, तरी विविध प्रकारचे मुलामे लावून ‘हा चित्रपट गुजरात दंगल, केंद्रीय अन्वेषण यंत्रणा, भाजप कशा प्रकारे मुसलमानांना लक्ष्य करत आहेत ?’, असे बिंबवण्याचा प्रयत्न चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून केरळमधील साम्यवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या बाजूने, तर हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष यांच्या विरोधात एक ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) स्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचे लेखक मुरली गोपी असून पृथ्वीराज यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे.

चित्रपटांमधील काही आक्षेपार्ह दृश्ये
१. या चित्रपटात वर्ष २००२ मध्ये बजरंगी नावाचा माणूस मुसलमानांच्या एका गटाचा पाठलाग करतो. हे सर्वजण पळून जाऊन आणि जीव मुठीत धरून एका मोठ्या राजवाड्यात आश्रय घेतात. तेथे बजरंगी नावाचा हिंदू खलनायक येऊन पोचतो. तो अनेक साथीदारांसह तलवार, कुर्हाडी, जाळण्याचे साहित्य घेऊन येतो आणि राजवाड्यात आश्रय घेणार्या मुसलमानांवर अत्याचार करत त्यांना ठार मारतो. गर्भवती मुसलमान महिलेवर बजरंगीचा एका साथीदार बलात्कार करतो आणि या सर्वांना नंतर जाळून ठार मारण्यात येते, असे दृश्य आहे. हिंदू लोक नंतर संपूर्ण गावाला जाळून टाकतात. हे दृश्य वर्ष २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीतील बिल्कीस बानो या प्रकरणाची आठवण करून देते.
या मुसलमानांमधील एक लहान मुसलमान मुलगा वाचतो. ज्याला पुढे जाऊन मोहनलाल प्रशिक्षण देतो आणि तो शेवटी सूड घेत बजरंगीला ठार मारतो, असे दाखवण्यात आले आहे.
२. एका प्रसंगात हिंदु नेता बजरंगी केरळमधील दोघा भावांच्या भांडणात आपल्याला आता केंद्रीय गृहमंत्र्यांचा आधार घ्यावा लागणार आहे, असे म्हणतांना दाखवण्यात आला आहे. असे सांगून अप्रत्यक्षरित्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नाव न घेता त्यांची अपकीर्ती करण्यात आली आहे, तसेच त्यांच्या आदेशामुळेच केंद्रीय यंत्रणा चुकीच्या गोष्टी करतात, असे दाखवण्यात आले आहे.
३. गुजरात दंगलीच्या आधारेच दोन नेते मोठे होतात. त्यातील एक बजरंगी आणि दुसरा त्याचा साथीदार असतो, असे दाखवले आहे. यातून अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे तेच दोघे आहेत, असेही निर्देशित करण्यात आले आहे.
४. शेवटच्या एका दृश्यात आपल्याच भावाच्या विरोधात राजकारण करणारी एक बहीण सगळ्यांपुढे येतांना तिरंगा रंगाची साडी नेसून येते आणि भाषण करते. (जिला ‘प्रियंका वाड्रा’सारखे दाखवले आहे आणि ती म्हणजे भारतमाता असल्यासारखे दाखवले आहे.) या भाषणाच्या कालावधीत केंद्रीय यंत्रणा येऊन तिच्यावर खोटे गुन्हे नोंद करून अटक करतात, असे दाखवले आहे. जेणेकरून बिगरभाजप शासित राज्यांमध्ये भाजप कशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना संपवते, नामोहरम करते, अशी खोटी कथानके रचून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
५. चित्रपटात केंद्रीय यंत्रणेचा एक अधिकारी प्रारंभीपासून दाखवण्यात आला आहे. हा अधिकारी कशा प्रकारे केंद्रातील सत्ताधार्यांचा ‘दलाल’ म्हणून काम करतो आणि केंद्रातील सत्ताधिशांना साहाय्य करतो, हे वारंवार विविध प्रसगांमध्ये दाखवले आहे, जेणेकरून केंद्रीय यंत्रणा या भाजपच्या हातातील ‘बाहुले’ बनल्याचे दाखवण्यात आले आहे.
६. या चित्रपटातील अनेक दृश्यांमध्ये ख्रिस्त्यांचेही उदात्तीकरण करण्यात आले आहे. ‘अनेक वेळा नायक जाणीवपूर्वक ‘फादर’चा (पाद्र्याचा) सल्ला घेतो’, असे दाखवण्यात आले आहे.
७. एकूणच हिंदूंना जाणीवपूर्वक आतंकवादी दाखवणारे अनेक प्रसंग असून त्याला चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने कोणत्याही प्रकारचे आक्षेप घेतलेले नाहीत, हे सगळ्यात धक्कादायक आहे.
८. चित्रपटात केरळचे सध्याचे मुख्यमंत्री त्यांचा पक्ष सोडून नवीन पक्ष काढण्याची घोषणा करतात. त्यासाठी ते बजरंगीला बोलावतात. असे करून तो धर्मांध शक्तींचे साहाय्य घेत आहे आणि त्याच्या विरोधात त्याची ‘निधर्मी’ विचारधारेची बहीण कशा प्रकारे पाठीशी उभी रहाते (जी प्रियंका वाड्राचा भास व्हावा, असे जाणीवपूर्वक दाखवले आहे.) असे दाखवले आहे. ‘केरळ एक धर्मनिरपेक्ष राज्य असून या राज्यात धर्मांध हिंदु शक्तींना स्थान नाही’, असा संदेश यातून जाणीवपूर्वक देण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतात जाणीवपूर्वक हिंदूंना आतंकवादी वा धर्मांध ठरवण्याचा प्रयत्न करणार्या चित्रपटांवर बंदी घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेत पालट व्हायला हवा, तसेच हिंदूंची अपकीर्ती करणार्या चित्रपटांसह निर्माते, दिग्दर्शक यांच्यावर कारवाई होण्यासाठी केंद्र सरकारने तसा कठोर शिक्षा करणारा कायदा करणे आवश्यक आहे.
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर. (३१.३.२०२५)
संपादकीय भूमिकाचित्रपटाच्या माध्यमातून केरळमधील साम्यवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या बाजूने, तर हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष यांच्या विरोधात एक ‘नॅरेटिव्ह सेट’ करण्याचा प्रयत्न ! |