
‘निरिच्छता पूर्णपणे आली पाहिजे’, हे म्हणण्याचे कारण असे की, निरिच्छपणाचे, नको वाटण्याचे, हे पुरे वाटण्याचे झटके माणसाला अनेक कारणांनी मधून मधून येत असतात; परंतु ते फार काळ टिकत नाहीत. व्यसनाधीन माणूस व्यसन सोडू शकत नाही. त्याचे नेहमीच ‘अगं अगं म्हशी मला कुठे नेशी’, या म्हणीतील गोष्टीसारखे होते. तसेच निरिच्छता मनाला, हृदयाला यावयाची असते. इंद्रियांना नाही.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘कर्मयोग’)