भाजपचा ‘जीव’ !

‘जसा राक्षसाचा जीव पोपटात होता, त्याप्रमाणे भाजपचा जीव ‘राम’ आणि ‘शिव’ यांमध्ये आहे. त्यामुळे ‘भाजपशी लढायचे असेल, तर राम आणि शिव यांच्याशी लढावे लागेल’, असे हिंदुद्वेषी फुत्कार काढले आहेत समाजवादी पक्षाचे नेते वीरपाल यादव यांनी ! ‘एक्स’वर त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. वीरपाल यादव हे नावावरून जरी भगवान श्रीकृष्णाच्या कुळातील असले, तरी ‘हिंदुद्वेषी वीरपाल हे त्यांच्या कुळाचे मोठे कलंक आहेत’, हेच यावरून सिद्ध झाले. मुसलमानांच्या बैठकीत त्यांचे ‘प्रबोधन’ करतांना त्यांनी वरील भाजप आणि हिंदु द्वेषी उद्गार काढले. ‘हिंदूच मुसलमानांना कसे हिंदूंच्या विरोधात भडकवत आहेत’, हे दर्शवणारे यासारखे दुसरे मोठे उदाहरण कुठले असेल ? वीरपाल यांच्यासारख्या हिंदु धर्माच्या ‘गद्दारां’ना किती पाप लागेल, याची गणती करता येत नाही; परंतु जे हिंदु हे मूकपणे पहात आहेत, त्यांनाही याचे काही ना काही पाप लागणारच आहे. हिंदूंच्या देवता आणि धर्म यांचा अवमान करणार्‍यांचा वैचारिक विरोध करत रहाणे, हीच सध्याच्या काळाची हिंदूंची ‘साधना’ आहे. सध्या विविध माध्यमांतून होणार्‍या देवता आणि महापुरुष यांच्या विडंबनाच्या विरोधात जनता आपणहून मोठ्या प्रमाणात आवाज उठवू लागली आहे. हिंदूंनी या संदर्भात सामाजिक माध्यमांतून दाखवलेल्या प्रचंड एकजुटीमुळे आजकाल हिंदूंच्या देवतांचे विडंबन असलेल्या चित्रपटांतून तो भाग काढणे भाग पडत आहे. या प्रकरणात यादव यांनी हिंदूंच्या देवतांना लक्ष्य करण्याची भाषा उघडपणे केली आहे. ‘राम आणि शिव यांना लक्ष्य करायचे’, म्हणजे यादव यांना नक्की काय अभिप्रेत आहे ? त्यांनी कदाचित ते त्यांच्या या बैठकीत पुढे सांगितलेलेही असू शकते. यापुढे राम आणि शिव यांच्या संदर्भात, त्यांची देवळे, मिरवणुका आदींच्या संदर्भात कुठलाही अपप्रकार घडला, तर तो या ‘कान फुंकणी’चा परिणाम आहे, असे हिंदूंनी म्हटले आणि न्यायालयात पुरावा म्हणून सादर केले, तर चुकीचे नाही.

‘समाजवादी पक्ष हा ‘समाजवादी’ नसून ‘नमाजवादी’ आहे’, अशी टीका केली जाते, ती किती सार्थ आहे, यासाठी वरील उदाहरण पुरेसे आहे. मते आणि सत्ता यांसाठी हिंदूंनी अतीखालच्या स्तराला जाऊन त्यांचे सर्वस्व विकले आहे आणि ते मुसलमानांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. त्यांना प्रसन्न करण्यासाठी स्वधर्माच्या, म्हणजेच हिंदूंच्या विरोधात काही ना काही बरळत आहेत. कुणी हिंदूने जर ‘समाजवादी पक्षाचा जीव अल्लामध्ये आहे’, असे म्हटले, तर काय गदारोळ होईल, माध्यमे ‘मोठी बातमी’ चालवतील, नेत्यांना सारवासारव करणारी, म्हणजे ‘जो बोलला त्याची चौकशी करून त्याला कठोर शिक्षा करू’, असे म्हणावे लागेल. वरील वक्तव्याची नोंद यांपैकी कुणी घेणार का ?

– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.