![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2024/06/08181916/ppdr-320.jpg)
‘मी प्रतिदिन केवळ शिकण्यावर भर देतो; कारण शिकण्यामध्ये जो आनंद आहे, तो शिकवण्यामध्ये नाही. साधकांना मार्गदर्शन करतांनाही साधकांना कशा प्रकारचे प्रश्न पडू शकतात, हे मला शिकता येते. त्या प्रश्नांची उत्तरे मी ग्रंथात घेतो. त्यातून साधकांनाही शिकता येते. त्याचसमवेत या जन्मात लिंगदेहामध्ये अधिकाधिक ज्ञानाचा संग्रह झाला, तर पुढील जन्मात पुष्कळ अधिक शिकावे लागणार नाही, या उद्देशानेही मी नेहमी शिकण्यावर भर देतो अन् शिकवण्यात वेळ वाया घालवत नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले