Karnatak Withdrew The Lesson : भारतामाता आणि हिंदू यांचा अवमान करणारा धडा कर्नाटक विद्यापिठाने घेतला मागे !

‘बीए प्रथम’ वर्षाच्या मराठी अभ्यासक्रमातील ‘बेळगु-१’ पाठ्यपुस्तकात होता वादग्रस्त धडा !

‘बेळगु-१’ पाठ्यपुस्तकात भारतामातेचा अपमान करणारी सूत्रे अंतर्भूत

धारवाड (कर्नाटक) – कर्नाटक विद्यापिठाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी ‘बीए प्रथम’ वर्षाच्या मराठी अभ्यासक्रमाच्या ‘बेळगु-१’ पाठ्यपुस्तकात भारतामातेचा अपमान करणारी सूत्रे अंतर्भूत केल्यामुळे जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक विद्यापिठाने तातडीने निर्णय घेत ‘बेळगु-१’ या पुस्तकातील वादग्रस्त धडा मागे घेतला आहे. (केवळ वादग्रस्त धडा मागे घेणे पुरेसे नाही, तर विद्यार्थ्यांवर चुकीचे संस्कार करणारे लिखाण करणारे लेखक आणि त्याला संमती देणारे अभ्यासक्रम सुधारणा समिती यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)

१. ‘बेळगु-१’च्या चौथ्या प्रकरणात ‘राष्ट्रीयत्व साजरे करण्याविषयी’ रामलिंगप्पा टी. बेगुर यांनी लिहिलेल्या धड्यात काही वादग्रस्त सूत्रे आढळली होती. या सूत्रांवर हरकती नोंदवल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने बैठक बोलावून वादग्रस्त धडा मागे घेण्याचा निर्णय घेतला.

जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या

२. संबंधित धड्यात ‘भारतमातेचे चित्र हिंदु मातेचे चित्र आहे’, असे नमूद करण्यात आले आहे. ‘भारत माता की जय’ ही घोषणा पराभवाची आठवण करून देते, असे लेखकाने लिहिले आहे.

३. यामध्ये केवळ देशविरोधी आणि धर्मविरोधी मजकूर नाही, तर चंद्रयान, राममंदिर यांसारख्या विषयांवरही खालच्या दर्जाच्या टिपण्या करण्यात आल्या आहेत.

४. ‘सोनिया गांधी विदेशी आहेत; म्हणून त्यांना पंतप्रधान होऊ दिले नाही’, ‘मुसलमान दंगल करतात, तेव्हा तो देशद्रोह मानला जातो, हिंदू दंगल करतात, तेव्हा ते धार्मिक कर्तव्य मानले जाते’, असे या लेखात नमूद केले आहे.

५. भारतमातेची कल्पना एका विशिष्ट वर्गाची आहे आणि ती इतरांना मान्य करण्यासाठी भाग पाडले जात आहे.

६. श्रीरामजन्मभूमी-बाबरी मशीद विवाद खोदून काढून इतिहास शोधणे कितपत योग्य आहे ? असा खोचक प्रश्‍न लेखकाने उपस्थित केला आहे.