‘१३.१२.२०२४ या दिवशी रात्री ८.२० वाजता पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडे यांनी देहत्याग केला. १४.१२.२०२४ या दिवशी त्यांचे अंत्यदर्शन घेतांना मला सूक्ष्मातून पुढील सूत्रे जाणवली.
१. पू. लोखंडेआजी यांचे पार्थिव ठेवलेल्या खोलीत प्रवेश करताच ‘आपण एखाद्या उच्च लोकात आलो आहोत’, असे मला वाटले. त्या वेळी ‘पू. आजींकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्यामुळे पूर्ण वायूमंडल भारित झाल्याची ही अनुभूती आहे’, असे मला जाणवले.
२. पू. आजींच्या पार्थिवाजवळ आणि खोलीतही वाईट शक्तींचा त्रास जाणवत नव्हता.
३. पू. आजींकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या भावामुळे पार्थिव ठेवलेल्या खोलीत चैतन्याचे प्रमाण ५५ टक्क्यांपेक्षा अधिक होते. मृत्यूच्या प्रसंगी वातावरणात एवढ्या प्रमाणात चैतन्य असणे दुर्मिळ असते.
४. पू. आजींच्या पार्थिवाला नमस्कार करतांना माझे मन निर्विचार झाले होते.
५. पू. आजींच्या पार्थिवाभोवती निर्गुण तत्त्वामुळे फिकट निळ्या रंगाची प्रभावळ दिसत होती आणि त्यातून वायूमंडलात पिवळ्या रंगाचा प्रकाश (चैतन्य) प्रक्षेपित होत होता.
६. संतांनी देहत्याग केल्यावर त्यांनी केलेल्या साधनेमुळे त्यांच्या पार्थिवाभोवती आणि वायूमंडलात विविध देवतांची तत्त्वे जाणवतात; परंतु पू. लोखंडेआजींच्या पार्थिवाभोवती अन् वायूमंडलात मला निर्गुण तत्त्व जाणवत होते.
थोड्या वेळाने पू. लोखंडेआजींच्या नातेवाइकांनी मला सांगितले, ‘‘संतांनी पू. आजींना अंत्यसमयी निर्गुणाशी संबंधित ‘शून्य’, हा नामजप करण्यास सांगितले होते. ‘शून्य’ हा नामजप करत त्या शून्यात विलीन झाल्या’, असे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितले.’’ तेव्हा ‘मला निर्गुण तत्त्व का जाणवत होते ?’, याचा उलगडा झाला.
७. पू. आजींच्या चेहर्यावर पुष्कळ तेज आणि भगव्या रंगाचे वलय जाणवत होते. ‘व्यष्टी साधनेमुळे त्या ‘आध्यात्मिक साध्वी (टीप १)’, या टप्प्यापर्यंत गेल्याची ही साक्ष आहे’, असे मला जाणवले.
टीप १ – आध्यात्मिक साधू किंवा आध्यात्मिक साध्वी : साधनेमुळे ज्यांच्या मनात स्वेच्छा निर्माण होत नाही, याउलट ‘वैराग्य’ हाच ज्यांच्या मनाचा स्थायीभाव झाला आहे, असे जीव.
८. पू. आजींच्या चेहर्याकडे पाहिल्यावर त्यांनी सहजावस्थेत आणि आज्ञाचक्रातून (टीप २) प्राण सोडल्याचे मला जाणवले. अंत्यसमयी त्यांच्या समवेत असणार्या त्यांच्या कन्या श्रीमती इंदुबाई श्रीधर भुकन (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५९ वर्षे) यांनी सांगितले, ‘‘अधिक हालचाल किंवा आवाज न करता पू. लोखंडेआजी यांनी देहत्याग केला.’’
टीप २ – आज्ञाचक्र : दोन भुवयांच्या वर कपाळाच्या मध्यस्थानी हे कुंडलिनीचक्र असते.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा. ॐ
परेच्छेकडून ईश्वरेच्छेकडे वाटचाल करून संतपद गाठणार्या पू. लोखंडेआजी !
१. पू. लोखंडेआजींनी ईश्वरेच्छेने देहत्याग करणे
१ अ. देहत्याग करतांना अन्य व्यष्टी संत आणि पू. लोखंडेआजी यांची स्वेच्छा, परेच्छा अन् ईश्वरेच्छा यांचे प्रमाण
वरील सारणीवरून पू. लोखंडेआजी यांनी ईश्वरेच्छेने देहत्याग केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे त्यांच्या लिंगदेहाला उच्च लोकात जायला स्थळ आणि काळ यांचे कोणतेच अडथळे आले नाहीत.
२. सहज अध्यात्म शिकवणारा पू. लोखंडेआजी यांचा जीवनप्रवास ! : व्यष्टी साधनेचे विवेचन करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणतात, ‘‘स्वेच्छा त्यागून परेच्छेने आणि पुढे ईश्वरेच्छेने वागणे’, हे साधनेचे टप्पे आहेत.’’ हे तत्त्व प्रत्यक्ष जगणार्या संत, म्हणजे पू. लोखंडेआजी ! पूर्ण आयुष्य धर्माचरणाचे पालन करून आणि परेच्छेने वागून पू. आजींनी संतपद गाठले. मुलीच्या कुटुंबियांसह आश्रमजीवन स्वीकारण्याच्या माध्यमातून त्यांची परेच्छेकडून ईश्वरेच्छेकडे वाटचाल चालू झाली. याचाच एक भाग म्हणून त्यांनी ईश्वरेच्छेने देहत्याग केला. थोडक्यात, ‘बुद्धीने अध्यात्म कळत नसले, तरी सहजपणे आध्यात्मिक जीवन कसे जगायचे ?’, याविषयीची आध्यात्मिक शिकवण पू. आजींच्या जीवनातून समष्टीला मिळते. अशा थोर संतांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार !’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा.
नातेवाइकांचा मृत्यू झाल्यावर आध्यात्मिक स्तरावर रहाण्याचे महत्त्व !‘एरव्ही संत असलेल्या नातेवाइकाचा मृत्यू झाला, तरी व्यक्तीच्या मनात संत नातेवाइकाविषयी भावना, विविध प्रकारचे ताण (पुढचे जीवन, अंत्यविधीची व्यवस्था, अन्य व्यवहारिक कामे इत्यादी) आणि काही प्रमाणात देवाण-घेवाण असते. त्यामुळे संतांच्या नातेवाइकांवरही काळ्या शक्तीचे आवरण निर्माण होते अन् ते विविध धार्मिक विधी केल्यावर काही काळाने न्यून होण्यास साहाय्य होते. यासाठी हिंदु धर्मात नातेवाइकांचा मृत्यू झाल्यावर १० दिवसांचे सुतक पाळण्याचे बंधन घातले आहे. सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडे यांचा १३.१२.२०२४ या दिवशी देहत्याग झाला. १४.१२.२०२४ या दिवशी त्यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी पू. आजींच्या कन्या श्रीमती इंदुबाई भुकन भेटायला येणार्या साधकांना थोडक्यात माहिती सांगून परत नामजप करण्याकडे लक्ष देत होत्या, तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व नातेवाईकही मनाने स्थिर होते. ते पू. आजींचे चैतन्य ग्रहण होण्यासाठी आध्यात्मिक भावाच्या स्तरावर प्रयत्न करत होते आणि स्थुलातून आपापल्या परीने अंत्यविधीची सिद्धता करत होते. अशा प्रकारे आध्यात्मिक स्तरावर रहाण्याचा प्रयत्न केल्यामुळे पू. आजींच्या सर्व कुटुंबियांना पू. आजींचे चैतन्य ग्रहण करता येत होते. कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाइकांवर वाईट शक्तीचे आवरण येते. पू. आजींच्या अनेक नातेवाइकांवर वाईट शक्तीचे आवरण असूनही ते भावस्थितीत असल्यामुळे त्यांचे चेहरे चांगले दिसत होते. यातून मला ‘मृत्यूसारख्या कठीण प्रसंगातही नातेवाइकांनी आध्यात्मिक भावाच्या स्तरावर प्रयत्न केल्यास त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होतो’, हे शिकायला मिळाले.’ – श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), |
|